रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा) विटवे येथील ग्रामपंचायत कार्यालयात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती निमित्त अभिवादन करण्यात आले. सर्व प्रथम सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस आंगनवाड़ी सेविका कांताबाई महाजन व उपसरपंच चेतन पाटिल , यांचे हस्ते पुष्पहार अर्पण करून पुजन करण्यात आले. [ads id="ads1"]
या प्रसंगी महाराष्ट्र जनक्रांती मोर्चा युवा जिल्हा अध्यक्ष साहेबराव वानखेड़े यांनी प्रस्ताविक केले तर आभार ग्रामसेवक मंगेश पाटील यांनी मानले यावेळी गजानन कोळी, पोलिस पाटील बाळु पवार, बाळु मनुरे, रतन भिल्ल, राजू भिल्ल रोजगार सेवक सिताराम वानखेड़े,ऑपरेटर, कैलास मनुरे संतोष कोळी, नारायण पाटील, आंगनवाड़ी सेविका कर्मचारी व गावातील गावकरी, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.



