रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा) छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल जळगाव येथे नुकत्याच झालेल्या जिल्हास्तरीय तायक्वांडो स्पर्धेमध्ये मॉडर्न इंग्लिश स्कूल रावेर येथील 14 वर्ष वयोगटातील इयत्ता आठवी ची विद्यार्थिनी कु. कोमल सुनील गाढे या विद्यार्थीनीने जळगाव जिल्हास्तरीय या तायक्वांडो स्पर्धेत भाग घेतला होता या विद्यार्थीनीने प्रथम क्रमांक पटकावून सुवर्णपदक मिळवून शाळेचा गौरव वाढविला. तसेच या विद्यार्थीनीला शाळेचे क्रीडा शिक्षक श्री. जयेश बिरपन सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. [ads id="ads1"]
या विद्यार्थीनीची विभागस्तरीय तायक्वांडो स्पर्धेमध्ये निवड झालेली आहे. या विद्यार्थीनीला शाळेचे संचालक मंडळ, मुख्याध्यापक, मुख्याध्यापिका, पर्यवेक्षक, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच साप्ताहिक सुवर्ण दिप वृत्तपत्राचे मुख्य संपादक राहूल डी गाढे यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
हेही वाचा:- भरधाव कारची बैलगाडीला धडक बैलगाडी चालक जागीच ठार ; रावेर तालुक्यातील वडगाव गावा जवळची दुर्घटना