यावल (सुरेश पाटील)- राज्य विज्ञान संस्था नागपूर व शिक्षण विभाग जि.प.जळगाव यांचे संयुक्त विद्यमाने सन 2022 -23 या शैक्षणिक वर्षातील जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन प्रथमच सावदा शहरातील डायमंड इंग्लिश मिडीयम स्कूल येथे दि. २४ आणि २५ जानेवारी या दोन दिवशी करण्यात आले आहे हे या संस्थेचे 50 वे जिल्हास्तरीय प्रदर्शन आहे. [ads id="ads1"]
या विज्ञान प्रदर्शनाचे उदघाटन दि. 24 रोजी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.पंकज आशिया, यांचे हस्ते होणार असून यावेळी अध्यक्षस्थानी शे.हारून शे. इकबाल,सचिव हाजी इकबाल हुसेन मल्टीपर्पज फाउंडेशन सावदा हे असून यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून रावेर तहसीलदार उषाराणी देवगुणे,ठिदिपाली कोतवाल,रावेर पंचायत समिती बी.डी.ओ.जे.के.पाटील अध्यक्ष महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळ हे उपस्थित राहणार आहे. [ads id="ads2"]
तर पारितोषिक वितरण सोहळा दि. 25 रोजी दुपारी 1 वाजता होणार असून यावेळी पारितोषिक वितरण कैलास कडलग उपविभागीय अधिकारी फैजपूर यांचे हस्ते होणार असून यावेळी अध्यक्षस्थानी डॉ.अनील झोपे, प्राचार्य डाएट जळगाव हे उपस्थित रहाणार असून यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ नितीन बच्छाव, शिक्षणाधिकारी माध्यमिक जी.प.जळगाव,एजाज शेख शिक्षणाधिकारी माध्यमिक जी. प.जळगाव,विकास पाटील शिक्षणाधिकारी प्राथमिक जी. प.जळगांव,श्रीमती रागिणी चव्हाण उपशिक्षणाधिकारी माध्यमिक जि.प.जळगांव, शैलेश देखणे गटशिक्षणाधिकारी प, स, रावेर,हे उपस्थित राहणार आहेत
हेही वाचा:- भरधाव कारची बैलगाडीला धडक बैलगाडी चालक जागीच ठार ; रावेर तालुक्यातील वडगाव गावा जवळची दुर्घटना
हेही वाचा:- रावेर तालुक्यातील "या" गावातील ग्रामपंचायत सदस्य अपात्र ; अतिक्रमण करणे भोवले
हेही वाचा :-ग्राम विकास अधिकारी अतुल पाटील याची बनवा बनवी : तक्रारदार करणार सहा फेब्रुवारी पासून पंचायत समिती कार्यालयासमोर बेमुदत उपोषण
या विज्ञान प्रदर्शनात जिल्ह्यातील विविध शाळातील विद्यार्थी आपले वैज्ञानिक प्रयोग यांचे प्रदर्शन दाखविणार असल्याने विद्यार्थ्यांना हे प्रदर्शन म्हणजे एक वैज्ञानिक पर्वणी असून हे प्रदर्शन पहाण्यासाठी उपस्थित राहावे असे आवाहन प्रसिध्दी प्रमुख प्रा.योगेश कोष्टी यांनी केले आहे.