रावेर (विनोद हरी कोळी) ऐनपूर येथील ऐनपूर शिक्षण प्रसारक मंडळ संचलित सरदार वल्लभभाई पटेल कला व विज्ञान महाविद्यालयाची खेळाडू कु प्रियांका तायडे, टी. वाय. बीएसी ची खेळाडू वेटलिफ्टिंगमध्ये ४९ कि.ग्रा. या वजन गटात व पॉवर लिफ्टिंग सन्याच व जके या कौशल्यात कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ संघात निवड करण्यात आलेली आहे. [ads id="ads1"]
सदर अखिल भारतीय आंतरविद्यापीठ स्पर्धा या कालिकत विद्यापीठ, कालिकत (केरळ) येथे २७ ते २९ जानेवारी २०२३ रोजी होणार आहेत. तिचा उमवि संघात निवड झाल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष श्री भागवत विश्वनाथ पाटील, संस्थेचे चेअरमन श्री श्रीराम पाटील, सेकेटरी श्री. संजय वामन पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष श्री. आर.एन. महाजन व संस्थेचे सर्व संस्थाचालक मंडळ व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जे बी अंजने [ads id="ads2"] महाविद्यालयातील स्थानिक कीडा समिती सदस्य, पा. डॉ. के. जी. कोल्हे, डॉ. पी. आर. गवळी, डॉ.आर. की, भोळे, डॉ. एस. आर. इंगळे, डॉ.सौ. रेखा पाटील, श्री. गोपाळ महाजन, क्रीडा संचालक डॉ. सचिन एन. झोपे व शिक्षकेतर कर्मचारी यांनी तिचे कौतुक केले व पुढील होणाऱ्या अखिल भारतीय आंतरविद्यापीठ स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
हेही वाचा:- भरधाव कारची बैलगाडीला धडक बैलगाडी चालक जागीच ठार ; रावेर तालुक्यातील वडगाव गावा जवळची दुर्घटना
हेही वाचा:- रावेर तालुक्यातील "या" गावातील ग्रामपंचायत सदस्य अपात्र ; अतिक्रमण करणे भोवले
हेही वाचा :-ग्राम विकास अधिकारी अतुल पाटील याची बनवा बनवी : तक्रारदार करणार सहा फेब्रुवारी पासून पंचायत समिती कार्यालयासमोर बेमुदत उपोषण