ले आऊटला बिन शेती परवानगी अंतिम मंजुरी शिफारस मिळाल्यानंतर फेरबदल ? लाखो रुपयाची रॉयल्टी बुडविण्याचे षडयंत्र : महसूल आणि नगरपरिषदेचे अर्थपूर्ण दुर्लक्ष

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे


यावल (सुरेश पाटील) यावल तहसील व नगरपरिषद हद्दीत भुसावळ रोडला लागून असलेल्या एका मिळकतला रहिवास प्रयोजनार्थ अकृषिक परवानगी मिळाली मिळाल्यानंतर या ठिकाणी विकासकाकडून उंच टेकडीचा,भाग जेसीपी मशीन द्वारा सपाटी करण्याचा डाव बिना परवानगी,बेकायदा सुरू असून यात खाजगीरित्या उद्योग सुरू असून शासनाची गौणखनीज रॉयल्टी लाखो रुपयाची बुडवली जात असून त्या गौण खनिजाचे संबंधित विकासात काय करणार? याकडे यावल महसूल विभागासह यावल नगर परिषदेचे अर्थपूर्ण जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचे संपूर्ण यावल शहरात बोलले जात आहे.[ads id="ads1"]  

        भुसावल रोडला लागून असलेल्या रहिवास प्रयोजनार्थ अकृषीक परवानगी मिळाल्यानंतरच्या जागेवर मागील महिन्यात सुद्धा अनधिकृत पणे जेसीपी मशीन द्वारा अवैध विनापरवानगीने माती खोदाई करून खाजगी कामासाठी वापर करायचे केले होते परंतु प्रसिद्ध होता बरोबर ते काम बंद करण्यात आले पुन्हा एक महिन्यानंतर त्या ठिकाणी खाजगी काम असताना महसूल कडून कोणतीही परवानगी न घेता गौण खनिजाचे उत्खनन अनधिकपणे सुरू करण्यात आले.[ads id="ads2"]  

        अकृषिक परवानगी मिळाल्यानंतर गटातील केलेल्या कामाचे रंगीत फोटो नगरपरिषदेकडे सादर करण्यात येतात अभिन्यासातील रस्ते, खडीकरण,साईडला गटारी, पथदिवे,पाण्याची व्यवस्था,पाईप लाईनची कामे इत्यादी केल्याची नोंद करण्यात येते त्यानंतर लेआउटला बिनशेती परवानगीसाठी व अंतिम मंजुरीची शिफारस नगरपालिकेकडून करण्यात येते,असे असताना त्या ठिकाणी विकास कामे अपूर्ण होती का? आणि कामे अपूर्ण होती तर परवानगी मिळाली कशी?असे प्रश्न यावल शहरात उपस्थित केले जात आहे.

हेही वाचा : रावेर तालुक्यातील त्या अवैध वृक्षतोड बाबतची चौकशी गुलदस्त्यात का ?

       अर्जदार यांनी दिलेली माहिती चुकीची आढळल्यास सदरचे प्रमाणपत्र रद्द समजण्यात येईल अशा प्रकारच्या जळगाव अपर जिल्हाधिकारी यांच्याकडून अटी शर्ती असताना.संबंधित यंत्रणेने आज पर्यंत या जागेवर कामे अपूर्ण किंवा पूर्ण आहेत किंवा नाही याची प्रत्यक्ष खात्री न केल्याने आजही विकासक त्याच्या सोयीनुसार गौण खनिज उत्खननाचे काम करीत असल्याने हे काम महसूल यंत्रणेने तात्काळ बंद करून यावल नगरपालिकेने तात्काळ कारवाई करावी.

      कारण या मिळकतला लागून यावल भुसावल हा अत्यंत रहदारीचा महामार्ग असून भविष्यात या मार्गाला लागून रहदारीस मोठा अडथळा निर्माण होईल याकडे जळगाव येथील नगर रचना सहाय्यक संचालक,अपर जिल्हाधिकारी, यावल नगरपरिषद मुख्याधिकारी,यावल तहसीलदार,अधीक्षक भूमी अभिलेख यावल,यावल सर्कल, व तलाठी यांनी तात्काळ लक्ष केंद्रित करून विकासावर कडक कारवाई करावी अशी मागणी संपूर्ण यावल शहरातून होत आहे.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!