रावेर ग्रामीण प्रतिनिधि (दिनेश सैमिरे) रावेर तालुक्यातील मुंजलवाडी (Munjalwadi Taluka Raver) येथे वास्तव्यास असलेल्या एका आदिवासी कुटुंबातील आरीफ मजित तडवी, वय -३२ वर्ष या युवकाने दि. २३ जानेवारी रोजी संध्याकाळच्या सुमारास ५ वाजेच्या दरम्यान घर आतून बंद करून आत्महत्या केली. [ads id="ads1"]
मुनाफ तडवी याने बाहेरून दरवाजा ठोठावल्यानंतर आतून कोणत्याच प्रकारचा प्रतिसाद मिळत नव्हता तेव्हा घराशेजारील लोकांनी दरवाजा तोडून बघितले असता आरीफ गळफास घेऊन लटकलेल्या अवस्थेत होता लोकांनी त्याला खाली उतरवून लागलीच रावेर पोलीस स्टेशनला फोन करून कळविले. [ads id="ads2"]
रावेर पोलीस स्टेशनच्या (Raver Police Station) उपनिरीक्षक दिपाली पाटील, पोलीस कॉन्स्टेबल सतीश सानप घटनास्थळी दाखल झाले तसेच मुंजवाडी गावातील सरपंच योगेश पाटील, पोलीस पाटील अनिल पाटील हे सुद्धा घटनास्थळी दाखल झाले शवाचा पोलिसांनी पंचनामा करून शव विच्छेदनासाठी रावेर ग्रामीण रुग्णालयात (Rural Hospital Raver) पाठविले असता रावेर येथील ग्रामीण रुग्णालयात (Raver Rural Hospital) डॉक्टर नसल्यामुळे दोन ते तीन तास शव वाऱ्यावर पडून राहिले असता त्या नंतर मुक्ताईनगर येथील डॉक्टर योगेश राणे यांना बोलवण्यात आले व शव विच्छेदन केलेे.
हेही वाचा : रावेर तालुक्यातील त्या अवैध वृक्षतोड बाबतची चौकशी गुलदस्त्यात ?
युनुस तडवी यांनी दिलेल्या फिर्यादी वरून रावेर पोलीस स्टेशनला सीआरपीसी कलम १७४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्ह्याचा पुढील तपास रावेर पोलीस स्टेशनचे (Raver Police Station) पोलीस निरीक्षक कैलास नागरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दिपाली पाटील पोलीस कॉन्स्टेबल सतीश सानप करीत आहेत.


