हलाल उत्पादनांची सक्ती हिंदूंना कशासाठी ? - सुनील घनवट, महाराष्ट्र आणि छतीसगड राज्य संघटक, हिंदु जनजागृती समिती
यावल (सुरेश पाटील) जळगाव जिल्ह्यातील सावदा,फैजपूर,यावल या परिसरामध्ये सर्रासपणे गोतस्करी,गोहत्या होत आहेत. जळगावमध्ये अवैधपणे पशूवधगृहे चालू आहेत. गोहत्यारे मोकाट आहेत आणि गोरक्षकांवर हल्ले होत आहेत. हे सर्व थांबवायचे असल्यास गावागावांत याविषयी आंदोलने व्हायला हवीत.वक्फ बोर्डच्या माध्यमातून महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातील चोपडा, नाशिक जिल्ह्यातील निफाड यांसह अनेक ठिकाणी वक्फ बोर्डने जमिनींवर दावा लावला आहे.या माध्यमातून लॅण्ड जिहादच चालू आहे.छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाने पावन झालेल्या भूमीमध्ये क्रूरकर्मा टिपू सुलतान आणि औरंगजेब यांचे उदात्तीकरण का केले जात आहे ? त्यांचे उदात्तीकरण न करता छत्रपतींचा जाज्वल्य इतिहास आणि स्वाभिमान समोर ठेऊन जीवन जगा. भारतात राहून पाकिस्तानचे गोडवे गाणार्या अभिनेत्याच्या ‘पठाण’ चित्रपटावर बहिष्कार घाला,असे आवाहन घनवट यांनी केले. ते 24 जानेवारीला यावल येथे आयोजित हिंदु राष्ट्र जागृती सभेत बोलत होते. [ads id="ads1"]
ते पुढे म्हणाले, जिहादच्या संकटात आणखी एका जिहादची भर पडली आहे. तो म्हणजे 'हलाल जिहाद' ! आपण 'हलाल' हा शब्द ऐकला असेलच. पूर्वी हलाल ही संकल्पना केवळ मांसापुरती होती, आता मात्र ती इस्लाम धर्मियांपुरतीच मर्यादित राहिलेली नाही, तर सर्वच समाजाला सक्तीने हलाल उत्पादने घेण्यापर्यंत विस्तारली आहे. केवळ मांसाहारी पदार्थच नाही, तर अनेक खाद्यपदार्थ, सौंदर्यप्रसाधने, धान्य, शीतपेये, चॉकलेटस्, इतकेच नाही, तर आयुर्वेदिक औषधांतही हलाल प्रमाणपत्र घेणे आरंभ झाले आहे. अनेक उत्पादनांवर 'हलाल'चा लोगो आपण पाहिला असेल. इस्लामी संस्थांकडून 'हलाल प्रमाणपत्र' घेतल्यानंतर हा हलालचा लोगो छापला जातो. 'हलाल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड', 'जमियत उलेमा-ए-हिंद हलाल ट्रस्ट', 'जमियत उलेमा-ए-महाराष्ट्र', 'ग्लोबल इस्लामिक शरीया सर्व्हिसेस' आदी संस्था भारतात हलाल प्रमाणपत्र देतात. या इस्लामी संस्थांकडून हलाल प्रमाणपत्र देतांना उत्पादन निर्मितीच्या वेळी इस्लामचे नियम पाळले जात आहेत कि नाहीत, हे पाहिले जाते. सेक्युलर म्हणवणाऱ्या भारतात उत्पादनांवर ही अनधिकृतपणे चाललेली धार्मिक प्रमाणपत्राची सक्ती कशासाठी ? आपल्या देशात कोणत्याही उत्पादनाला प्रमाणपत्र देण्याची जबाबदारी भारत सरकारचे 'अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण' (FSSAI ),तसेच विविध राज्यांत 'अन्न व औषध प्रशासन' (FDA) हे विभाग खाद्यपदार्थ तसेच औषधे यांच्याशी संबंधित सर्व अनुमती देतात.असे असतांना पुन्हा 'हलाल प्रमाणपत्र' कशासाठी ? वर्ष २०१७ मध्ये 'हलाल अर्थव्यवस्था' २.१ 'ट्रिलीयन अमेरिकी डॉलर्स' एवढी होती. (१ 'ट्रिलीयन' म्हणजे १ वर १२ शून्य ) या अर्थव्यवस्थेच्या माध्यमातून किती प्रचंड प्रमाणात पैसा उभा रहात आहे, हे यातून लक्षात येते. 'हलाल'ची अनिवार्यता मुसलमानांसाठी आहे; हिंदूंसाठी नाही. मुसलमानांनी अवश्य त्यांचा वापर करावा. उत्पादकांनी मुसलमानांसाठी बनवलेली उत्पादने सरसकट हिंदूंना विकली जात आहेत.१४टक्के मूसलमानांच्या मागणीमळे ८० टक्के हिंदू समाजाला सक्तीने हलाल उत्पादने विकली जात आहेत. [ads id="ads2"]
या वेळी सनातन संस्थेचे घर्मप्रचारक सद्गुरू नंदकुमार जाधव, रणरागिणी शाखेच्या कु. रागेश्री देशपांडे यांनीही उपस्थित हिंदूंना संबोधित केले. या सभेसाठी विविध हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि राजकीय पक्ष यांचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांसह शहर, तसेच आजूबाजूच्या गावांतील धर्माभिमानी हिंदू हजारोंच्या संख्येने उपस्थित होते. प्रारंभी कमलेश शिर्के यांनी केलेल्या शंखनादानंतर मान्यवर वक्त्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. यानंतर मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण केला. येथील वेदमूर्ती वेदशास्त्र संपन्न सर्वश्री अथर्व बयाणी, महेश बयाणी, प्रसाद कुलकर्णी यांनी वेदमंत्रपठण केले. हिंदु जनजागृती समितीच्या कार्याचा आढावा हिंदु जनजागृती समितीचे जळगाव जिल्हा समन्वयक प्रशांत जुवेकर यांनी मांडला. सूत्रसंचालन कुमारी भाग्यश्री भिरुड यांनी केले.
हिंदूंनो,येणाऱ्या आपत्काळासाठी धर्माचरण आणि साधना करा ! - सद्गुरु नंदकुमार जाधव, धर्मप्रचारक, सनातन संस्था
येणारा काळ हा महाभयंकर आपत्काळ आहे. म्हणजे संकटांचा काळ आहे, असे अनेक संत, भविष्यवेत्ते यांनी सांगितले आहे. फ्रान्सचा भविष्यवेत्ता नॉस्ट्रॅडॅमस, संत गगनगिरी महाराज, देव हालसिद्धनाथ यांनी सांगितलेली बरीच भविष्ये खरी ठरली आहेत. तिसऱ्या महायुध्दाविषयी देखील त्यांनी सांगून ठेवले आहे. तिसरे महायुद्ध इतके महाभयंकर होणार आहे की, पहिली दोन महायुद्धे खेळण्यासारखी वाटतील. सध्याची जागतिक परिस्थिती पहाता तिसऱ्या महायुध्दाची ठिणगी केव्हाही पडू शकते. भूकंप, उष्णतेची लाट, महापूर, टोळधाड, वादळे यांसारख्या संकटांची मालिका चालू आहे. हा सर्व कालचक्राचा परिणाम आहे. कालमहिम्यानुसार वर्ष २०२५ ला हिंदु राष्ट्र येणारच आहे. हिंदुराष्ट्राची पहाट पहाण्यासाठी साधना करून धर्माचरणी बनूया, असे मार्गदर्शन सनातन संस्थेचे धर्मप्रचारक सद्गुरू नंदकुमार जाधव यांनी केले.
--------------------------------------
'लव्ह जिहाद' ला देशातून हद्दपार करण्यासाठी हिंदु राष्ट्र आवश्यक ! - कु. रागेश्री देशपांडे, रणरागिणी शाखा
इस्लामी पद्धतीने बुरखा परिधान करत नाही, इस्लामी परंपरांचे पालन करत नाही म्हणून अवघ्या २३ वर्षांच्या रूपाली चंदनशिवे या तरुणीची हत्या, कारण 'लव्ह जिहाद' ! याआधी आणि नंतरही अनेक प्रकरणे घडली. याहून भयंकर प्रकरण घडले ते १४ नोव्हेंबर २०२२ यादिवशी. आफताब नावाच्या धर्मांधाने त्याच्यासोबत 'लिव्ह इन' मध्ये रहाणाऱ्या श्रद्धा वालकर नावाच्या हिंदु मुलीची निघृण हत्या केली. प्रेयसीने केवळ लग्नासाठी हट्ट केला, करवतीने ३५ तुकडे करून ते फ्रीजमध्ये ठेवले आणि ते तुकडे मध्यरात्री विविध ठिकाणी टाकून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला. इतकी क्रूर हत्या, आपण विचारच करू शकत नाही. 'लव्ह जिहाद' च्या माध्यमातून हिंदु मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांचे धर्मांतर करणे; 'हिंदु' असल्याचे भासवून खोटे नाव सांगत मुलींची फसवणूक करणे; त्यांच्याशी शारीरिक संबंध ठेवून किंवा बलात्कार करून त्यांना ब्लॅकमेल करणे; निकाह केल्यावर मारहाण करणे; प्रसंगी जीवे मारणे; वेश्याव्यवसायात ढकलणे किंवा आखाती देशांत विकणे हे आणि यांहूनही भयानक प्रकार उघडकीस येत आहेत. हे अतिशय भयावह आहे.आज देशातील ९ राज्यांत 'लव्ह जिहाद विरोधी कायदा' संमत झाला आहे, तर काही ठिकाणी होण्याच्या मार्गावर आहे. अनेक राज्यांत झालेल्या कायद्याप्रमाणे महाराष्ट्रातही 'लव्ह जिहाद विरोधी कायदा' लवकरात लवकर व्हावा, यासाठी आजची 'हिंदु राष्ट्र- जागृती सभा आहे. या 'लव्ह जिहाद' ला देशातून हद्दपार करण्यासाठी आम्हाला हिंदु राष्ट्र हवे आहे.
--------------------------------------
आढावा बैठक
सभेनंतर यावलमधील हिंदु राष्ट्राच्या कार्याचे पुढील नियोजन करण्यासाठी गुरुवार दि. 26 जानेवारी रोजी सायंकाळी 6 वाजता श्री रेणुका देवी मंदिर येथे महत्वाच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे, तरी धर्मप्रेमी बांधव यांनी अवश्य उपस्थित राहावे,असे आवाहन हिंदू जनजागृती समितीचे जळगाव जिल्हा समन्वयक प्रशांत जुवेकर यांनी केले आहे.
--------------------------------------


