केंद्र सरकारच्या भारतमाला परियोजने अंतर्गत सुरत-चेन्नई राष्ट्रीय महामार्गाला विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव द्यावे - आजाद समाज पार्टीची निवेदनाद्वारे मागणी

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे


नाशिक (सुवर्ण दिप वृत्तसेवा ) नाशिकचे जिल्हाधिकारी डी.गंगानाथन यांना दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की वरील विषयास अनुसरून आम्ही आपणास निवदेन सादर करतो की, भारत देशाचे वैभव असलेला महाराष्ट्र राज्य या राज्यातून आपल्या मातीतून केंद्र सरकारच्या भारतमाला परियोजने अंतर्गत सुरत चेन्नई राष्ट्रीय महामार्ग जात असुन सदर महामार्ग हा महाराष्ट्र गुजरात तथा आंध्रप्रदेश या तीन राज्यांना एकच जोडणारा महामार्ग अजून या महामार्गामुळे भारतातील औदयोगिक विकास व प्रगती होणार आहे. [ads id="ads1"]  

   तसेच दळण वळणाचा साधनांना यथा योग्य चालना मिळणार आहे. सदर महामार्ग हा आंतरराष्ट्रीय दर्जाचा ओळखला जाणारा आहे हा महामार्ग जागतिक नकाशावर येत्या काळात आपणास बघावयास मिळणार आहे याचा सार्थ अभिमान आहे महाराष्ट्रातील नाशिक अहमदनगर धाराशिव सोलापूर या प्रमुख जिल्हयातून जाणार आहे सदर महामार्गामुळे महाराष्ट्राच्या प्रगतीत भर पडणार आहे परंतू एवढ्या मोठ्या ख्यातीचा महामार्ग असून या महामार्गाचे नामकरण हे जागतिक ख्यातीचे महापुरुष यांच्या नावाने व्हावे अशी अपेक्षा आहे. [ads id="ads2"]  

      तरी महोदय आम्ही या निवेदना द्वारे आपणास समस्त आंबेडकर अनुयायांच्या वतीने आपणास सूचित करू इच्छितो कि आपण सदर महामार्गाला विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय महामार्ग असे नाम करण करावे आपणास आम्ही या पत्राद्वारे विनंती करत आहोत कि आपण आम्ही सुचविलेल्या नावाने म्हणजेच विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सुरत चेन्नई राष्ट्रीय महामार्ग असे नामकरण करावे हि विनंती नाशिकचे जिल्हाधिकारी डी.गंगानाथन यांना उत्तर महाराष्ट्र युवा अध्यक्ष आझाद समाज पार्टी मुकेश गांगुर्डे,संदीप मोरे,किरण खिल्लारे,हेमंत जावळेकर,मीना गांगुर्डे, सुनिता पवार, मनिषा पवार यांनी निवेदनाद्वारे मागणी केली.

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!