रावेर ग्रामीण प्रतिनिधी ( दिनेश सैमिरे) माजी राज्यमंत्री दिव्यांगांचे कैवारी माननीय श्री. बच्चुभाऊ कडू यांचा सेवेचा वारसा अविरतपणे चालू रहावा या उद्देशाने आज मौजे ऐनपुर येथील ज्यांना हात नाही,पाय नाही,डोळे नाही,ज्यांना मोलमजुरी करणे ही कठीण आहे. [ads id="ads1"]
अशातच त्यांना राहण्यासाठी निवाऱ्याची व्यवस्था नाही अश्या दिव्यांग बांधवांना शासनाकडून त्वरित घरकुलाच्या माध्यमातून हक्काचा निवारा मिळावा म्हणून आज प्रहार जनशक्ती पक्षाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अनिल भाऊ चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रहार शेतकरी जिल्हाध्यक्ष सुरेश चिंधु पाटील व प्रहार दिव्यांग क्रांती संघटना जिल्हाध्यक्ष माननीय बाळासाहेब पाटील यांच्या आदेशाने ऐनपुर ग्रामपंचायत कार्यालयाचे ग्रामसेवक श्री.गोसावी भाऊसाहेब यांना निवेदन देण्यात आले. [ads id="ads2"]
या प्रसंगी प्रहार अल्पसंख्याक रावेर तालुका अध्यक्ष वसीम भाई,प्रहार युवा तालुका अध्यक्ष योगेश निकम,प्रहर दिव्यांग क्रांती संघटना रावेर तालुकाध्यक्ष विनोद कोळी, उपाध्यक्ष जितू कोळी, कार्याध्यक्ष दिनेश भाऊ सैमिरे,विश्वनाथ भिल व सुरेश भाऊ.सजय भाऊ. गणेश पाटील सर्व कार्यकर्ता उपस्थित होते.


