ऐनपूर महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना शिबिराचे बलवाडी येथे उद्घाटन

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे


ऐनपूर (विनोद हरी कोळी) : येथील सरदार वल्लभभाई पटेल कला व विज्ञान महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबीराचे उद्घाटन दि. १७/०१/२०२३ मंगळवार रोजी दत्तक वस्ती बलवाडी ता. रावेर येथील जि. प. मराठी शाळेत संपन्न झाले. या उद्घाटनाच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष ऐनपूर परिसर प्रसारक मंडळाचे अध्यक्ष मा. भागवतभाऊ पाटील हे होते. [ads id="ads1"]  

  सदर कार्यक्रमाचे उद्घाटन माजी सैनिक श्री. गोकुळ महाजन यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून बलवाडी येथील सरपंच सौ वैशाली ताई महाजन, उपसरपंच श्री उदय वाघ, ग्रामपंचायत सदस्य श्री जितेंद्र महाजन, वि. का. सोसायटीचे चेअरमन श्री. गोपाळ तुकाराम पाटील, ऐनपूर परिसर शिक्षण प्रसारक मंडळाचे चेअरमन श्री. श्रीराम पाटील, उपाध्यक्ष रामदास महाजन,संचालक श्री. विजय पाटील, श्री. पी आर चौधरी, दिलीप पाटील, जि. प. शाळेच्या व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. महेश पाटील, जि. प. शाळेचे मुख्याध्यापक श्री. प्रभाकर पाटील, श्री. ज्ञानेश्वर पाटील, श्री. अरविंद पाटील, गोविंदा महाजन, प्राचार्य डॉ. जे. बी. अंजने, बलवाडी गावचे ग्रामसेवक श्री. प्रकाश तायडे, श्री. गोपाळ महाजन हे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला सरदार पटेलांच्या प्रतिमेचे पूजन करून दिपप्रज्वलन करण्यात आले.[ads id="ads2"]  

   ग्रामपंचायत सदस्य श्री. जितेन्द्र महाजन यांनी शिबिरार्थींना शुभेच्छा दिल्या. उद्घाटन माजी सैनिक श्री गोकुळ महाजन यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की महाविद्यालयीन जीवनात पदार्पण करत असतांना चुकीचे पाऊल पडू देऊ नका, शिबिरातून चांगले विचार घ्या. संस्कार कान पकडून घडविता येत नाहीत ते रासेयो शिबिरात आपोआप होतात.प्रामाणिकपणे श्रमदान करून शिबिर यशस्वी करा असे मा. प्राचार्य डॉ. जे. बी. अंजने यांनी मार्गदर्शन करातांना सांगितले. सोशल मिडीयाचा वापर व आत्महत्येचे प्रमाण खूप वाढलेले आहे याचा विचार तुमच्या सारख्या तरुणांनी केला पाहिजे. दत्तक वस्ती गावात कोणाच्याही भावना दुखावणार नाही याची काळजी घ्या असेही ते म्हणाले. सध्या जास्तीत जास्त अपघात का होतात याविषयावर गटचर्चा घ्या असे त्यांनी सांगितले. मा. भागवतभाऊ पाटील यांनी अध्यक्षीय भाषणात शिबिरार्थींना शुभेच्छा दिल्या. शिबिरातून जाऊन आपण आपल्या परिसरात काय करू शकतो याचा विचार केला पाहिजे. शिबिरातून चांगले विचार घ्या, मोबाईलचा वापर कमी करा असे त्यांनी सांगितले. आज विद्यार्थ्यावर खऱ्या अर्थाने संस्कार करण्याची गरज आहे. तुम्ही शरीराला व मनाला जसे वळण द्याल त्या पद्धतीने तुमचे व्यक्तिमत्व घडेल असेही ते म्हणाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक अल्ताफ पटेल यांनी तर प्रास्ताविक मुख्य कार्यक्रम अधिकारी प्रा डॉ दिपक पाटील यांनी व आभारप्रदर्शन राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक मेहल पाटील यांनी केले. सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मा. प्राचार्य डॉ. जे. बी. अंजने यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. दिपक पाटील, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. एस. बी. पाटील, महिला कार्यक्रम अधिकारी सौ. रेखा पाटील, श्री. गोपाळ महाजन, प्राध्यापक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी व रासेयो स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले. तसेच जि.प. मराठी शाळा बलवाडी येथील शिक्षक आणि ग्रामस्थ यांचे सहकार्य लाभले.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!