रावेर तालुक्यातील विवरा बु येथे पिस्तुलाचा धाक दाखवत सोन्यासह रोकड चोरटयांनी लांबविली ; अज्ञात चोरट्याविरोधात निंभोरा पोलीसात गुन्हा दाखल

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

रावेर तालुक्यातील विवरा बु येथे पिस्तुलाचा धाक दाखवत सोन्यासह रोकड चोरटयांनी लांबाविली ; अज्ञात चोरट्याविरोधात निंभोरा पोलीसात गुन्हा दाखल

विवरे ता.रावेर (समाधान गाढे) रावेर तालुक्यातील विवरे बुद्रुक (Vivare Bk Tal Raver) येथील सरदार वल्लभभाई पटेल नगरातील किशोर पीतांबर राणे यांच्या घरातील सोन्याचे दागिने व रोकड चोरट्यानी लंपास केल्याची घटना मंगळवारी पहाटे २ वाजेच्या सुमारास घडली. पिस्तुलाचा धाक दाखवून ही चोरी करण्यात आली व चोरीनंतर किशोर राणे यांचे हात पाय चोरट्यांनी बांधून ठेवत चोरांनी पलायन केले. [ads id="ads1"]  

           किशोर राणे यांची पत्नी व मुले बाहेरगावी असल्याने ते घरी एकटेच होते. मंगळवारी पहाटे २ वाजेच्या सुमारास ते लघुशंकेसाठी बाहेर आले असता वेगवेगळ्या बाजूने चार चोरटे त्याठिकाणी आले व त्यांचे तोंड बांधून कानाला पिस्तूल लावून घरात नेले. पैसे व दागिन्यांची मागणी केली. त्यांना घरात नेऊन कपाटाची चावी घेऊन कपाटातील २ तोळे सोने, तसेच पंधरा हजार रोख असा ऐवज काढून चोरट्यांनी किशोर राणे यांचे तोंड व पाय बांधून घटनास्थळावरून पलायन केला. [ads id="ads2"]  

      घटनेची माहिती मिळताच निंभोरा पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक गणेश धुमाळ यांनी घटनास्थळाची पाहणी केली. व निंभोरा पोलीस ठाण्यात (Nimbhora Police Station) अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा :- बोराच्या झाडाला गळफास घेत तरुणाने संपविली जीवन यात्रा आत्महत्या : जळगाव जिल्ह्यातली घटना 

हेही वाचा :- रावेर तालुक्यातील कोचुर बु येथील ग्रामसेवकावर शिस्तभंगाच्या कारवाईसाठी राज्याच्या लोक आयुक्तांकडे दाद मागणार : तक्रारदार निरंजन तायडे यांची प्रसारमाध्यमांना माहिती 

        सदर घटनेचा पुढील तपास निंभोरा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश धुमाळ यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस करीत आहे.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!