ऐनपूर ता.रावेर (विनोद हरी कोळी) मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त मराठी विभाग आणि प्राध्यापक प्रबोधिनी यांच्या मार्फत सरदार वल्लभभाई पटेल कला आणि विज्ञान महाविद्यालयात प्राचार्य डॉ.जे.बी. अंजने यांच्या मार्गदर्शनाखाली मराठी भाषेची आजची सांप्रत स्तिथी या विषयावर प्रा. महेंद्र सोनवणे यांनी सविस्तर व्याख्यान दिले.कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.जे.बी.अंजने यांनी भाषा हे संवाद साधण्याचे माध्यम आहे. [ads id="ads1"]
सर्व व्यवहार मराठी भाषेतून झाले पाहिजे असे सांगितले .या प्रसंगी महाविद्यालयातील प्रा. डॉ किशोर कोल्हे , प्रा एच एम बाविस्कर,प्रा एस बी महाजन, प्रा . डॉ.सतिष पाटील, प्रा.डॉ.पी आर.गवळी, प्रा.डॉ.सतिष वैष्णव,प्रा. डॉ. पी आर महाजन,प्रा डॉ व्ही एन रामटेके , [ads id="ads2"] प्रा.सुनील इंगळे, ,प्रा. डॉ . साळुंखे, प्रा. मुळे प्रा. अक्षय महाजन, प्रा. बारी, प्रा. अंकुर पाटील तसेच महेंद्र महाजन, सुनील पाटील गोपाल पाटील, नितीन महाजन, श्रेयस पाटील, जयेश बढे, ऋषीकेश महाजन, अनिकेत पाटील इत्यादी शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी उपस्थित होते.आभार ग्रंथपाल प्रा डॉ संदिप साळुंखे यांनी मानले.


