यावल (सुरेश पाटील)
गेल्या एक-दीड वर्षापासून यावल नगरपरिषदेत प्रशासक आणि प्रभारी मुख्याधिकारी यांच्या कारभारामुळे आणि आजी-माजी काही नगरसेवक प्रशासकीय कामकाजामुळे आपली तटस्थ भूमिका निभावत असल्याने यावल नगरपरिषदेचे 95 टक्के कामकाजावर विपरीत परिणाम झाला आहे,यात प्रामुख्याने यावल नगरपालिकेतील काही कर्मचाऱ्यांना त्यांच्या पदवी नुसार आणि पदानुसार नगरपरिषद कामकाजाचा अनुभव नसल्याने यावल नगर परिषदेच्या कामकाजाचे बारा वाजले आहेत. [ads id="ads1"]
भुसावल कडून यावल शहरात प्रवेश करताना बोरावल दरवाजा पासून तर यावल नगर परिषदेच्या जुन्या बंद पडलेल्या भुसावळ नाक्या पर्यंत यावल नगरपरिषदेने मोठा गाजावाजा करून रस्त्याचे रुंदीकरण,डांबरीकरण व त्यात दुभाजक टाकून रस्ता बांधकाम केले होते आणि आहे.भुसावळहून आल्यानंतर यावल शहरात प्रवेश करताना जुन्या बंद पडलेल्या नाक्याजवळ उजव्या बाजूचा रस्ता घाण पाण्याची गटार आणि नाला सदृश्य झालेला प्रत्यक्ष दिसून येत आहे यामुळे फक्त एका डाव्या बाजूने येणारी आणि जाणारी वाहतूक सुरू असल्याने शेतकरी वर्गास व इतर सर्व नागरिकांना,सर्व प्रकारच्या वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. [ads id="ads2"]
याच प्रमाणे चोपडा अंकलेश्वर -बऱ्हाणपूर महामार्गावरून यावल शहरात प्रवेश करताना हडकाई- खडकाई नदी पात्रात झालेले अनधिकृत,अतिक्रमण आणि बांधकाम तसेच बुरुज चौकात अतिक्रमित पटेल टी सेंटर आणि यावल पोलीस स्टेशन समोर सातोद रस्त्याच्या दर्शनी भागावर सतत वाहते घाण पाणी रस्त्यावर येत असल्याने त्या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभाग, नगरपालिकेने फक्त खडी टाकून तात्पुरता रस्ता तयार केल्याने संपूर्ण यावल तालुक्यातील नागरिकांना यावल पोलीस स्टेशनला, ग्रामीण रुग्णालयात,यावल तहसील कार्यालयात तसेच दुय्यम निबंधक कार्यालयात येण्या जाण्यास मोठा अडथळा निर्माण होत आहे या ठिकाणी रस्ता मोठ्या प्रमाणात खराब झाल्याने तसेच रस्त्यावर खडी टाकल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत असतो त्यामुळे दिवसभर किरकोळ स्वरूपात भांडण तंटे होत असतात. तसेच यावलहून भुसावळ कडे जाताना यावल येथे जुन्या भुसावळ नाक्याजवळ वळणावर वाहनधारकांना न दिसणारा अदृश्य असा एक ते दोन फुटाचा खोल जीवघेणा आणि अपघातास निमंत्रण देणारा खड्डा पडला आहे, याच्यापुढे दोनशे ते तीनशे मीटर अंतरावर महामार्गाच्या दिशा फलकाच्या खाली मोठ्या प्रमाणात रस्ता नादुरुस्त झालेला आहे.हा सर्व प्रकार संबंधित अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष दिसत असून सुद्धा कायदेशीर मुग गिळून गप्प आहेत हे यावलकरांचे दुर्भाग्य म्हणावे लागेल.
हेही वाचा :- ग्रामसेवकाला अडीच हजाराची लाच घेतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागा कडून रंगेहाथ अटक : जळगाव जिल्ह्यातील घटना
नगर विकास मंत्रालयातर्फे तसेच संबंधित विभागाचा आदेश असताना आठवडे बाजारातील शॉपिंग सेंटर आणि अतिक्रमण काढणे संदर्भातील निर्णय आजही प्रलंबित असल्याने तसेच ठोस निर्णय घेतला जात नसल्याने आठवडे बाजार भरण्यास जागा अपूर्ण पडते पर्यायी यावल शहरात वेगवेगळ्या 2 ठिकाणी आणि भर रस्त्यावर आठवडे बाजार भरत असल्याने यावल शहरात एखाद्या वेळेस फार मोठी अप्रिय घटना घडू शकते असे संपूर्ण यावल शहरासह तालुक्यात बोलले जात आहे यासाठी जिल्हाधिकारी जळगाव,प्रशासकीय अधिकारी तथा प्रांताधिकारी कैलास कडलग यांनी आपले लक्ष केंद्रित करून यावल नगरपालिकेच्या विस्कळीत झालेल्या,भोंगळ तसेच सोयीनुसार सुरू असलेल्या कारभाराकडे लक्ष केंद्रित करून तात्काळ,ठोस निर्णय घेऊन जनहिताचे निर्णय घ्यावेत असे यावल शहरासह तालुक्यात बोलले जात आहे.


