सावदा प्रतिनिधी (युसूफ शाह)
तासखेडा ता.रावेर तालुक्यातील तासखेडा येथे वीटभट्टी जवळ मोठ्या प्रमाणात जेसीबीद्वारे अवैध माती उत्खनन सुरू असल्याचे वृतांकन करीत असताना जेसीबी मालक शुभम विकास पाटील रा.तासखेडा ता.रावेर जि.जळगाव यांनी तासखेडा येथील मंडे टू मंडे न्यूज चे वार्ताहर अनिल इंगळे यांना अश्लिल शिवीगाळ करून त्यांचेकडील चित्रीकरण करीत असलेला रेअलमी कंपनीचा मोबाईल फोन जबरण हिसकावून घेत त्यांस जिवे ठार मारण्याची धमकी दिली असून त्यांचे जीवास काही एक बरेवाईट झाल्यास सदर व्यक्ती जबाबदार राहील. [ads id="ads1"]
सदर लघु पाटबंधारे यांच्या असलेलेल्याजमिनीवर अवैधरीत्या माती उत्खनन करण्यात आलेले असून तशा प्रकारचे पुरावे आमच्याकडे उपलब्ध आहेत.त्याच प्रकारे अशा अवैध माती उत्खनन तसेच अवैध गौणउत्खननाच्या घटना तालुक्यात मोठ्या प्रमाणावर होत असून महसूल प्रशासनाने सखोल चौकशी करण्यात यावी व संबंधित जेसीबी मालक यांचेवर कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी. [ads id="ads2"]
तसेच संबंधित प्रकरणाची लवकरात लवकर सखोलपणे चौकशी करून दोषींवर कायदेशीर कार्यवाही करावी व तसा अहवाल देण्यात यावा.अशी मागणीचे निवेदन रावेर तहसीलदार सह उपविभागीय अधिकारी फैजपूर यांना रावेर ग्रामीण पत्रकार संरक्षण समितीच्या वतीने देण्यात आले.निवेदनाप्रसंगी रावेर ग्रामीण पत्रकार संरक्षण समितीचे तालुकाध्यक्ष प्रदीप महाराज पंजाबी,उपाध्यक्ष युसूफ शहा,भीमराव कोचुरे,संघटक अनिल इंगळे,फरीद शेख,प्रसिद्धि प्रमुख चंद्रकांत वैदकर,योगेन्द्र भालेरावं,मंडे टू मंडे चे मुख्य संपादक भानुदास भारंबे आदी उपस्थित होते.सदरचे निवेदन उपविभागीय अधिकारी फैजपूर यांच्या तर्फे अव्वल कारकून शरीफ तडवी यांना सुविकार केले.
हेही वाचा :- ग्रामसेवकाला अडीच हजाराची लाच घेतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागा कडून रंगेहाथ अटक : जळगाव जिल्ह्यातील घटना


