रावेर तालुका प्रतिनिधी- विनोद हरी कोळी
माजी राज्यमंत्री माननीय बच्चुभाऊ कडू यांच्या विचाराने प्रेरित होऊन, प्रहार जनशक्ती पार्टीचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष तसेच प्रहार दिव्यांग क्रांती संघटना जिल्हा अध्यक्ष माननीय बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली खाली प्रहार दिव्यांग क्रांती संघटना रावेर तालुका अध्यक्ष विनोद कोळी यांच्यातर्फे दिव्यांग बांधवांच्या त्यांच्या हक्काच्या योजना त्यांना त्वरित मिळाव्यात या संदर्भात निवेदन देण्यात आले. [ads id="ads1"]
आज दिनांक 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनी निंबोल येथील ग्रामपंचायत मध्ये उपसरपंच अशोक पाटील यांना दिव्यांग बांधवांच्या विविध मागण्यासंदर्भात निवेदन देण्यात आले.
दिव्यांग बांधवांचे निवेदन खालील प्रमाणे आहेत.
1) दिव्यांग व्यक्तींना घरपट्टी व पाणीपट्टी मध्ये 50% सवलत मिळावी.
2) तसेच दिव्यांग व्यक्तींना विनाट घरकुल योजना मिळावी.
3) दिव्यांग व्यक्तींना व्यवसाय करण्यासाठी ग्रामपंचायतीच्या गाड्यांमध्ये तीन टक्के आरक्षण द्वारे गाळे उपलब्ध करून देणे.
किंवा गाडे नसतील तर दोनशे स्क्वेअर फुट जागा व्यवसायासाठी उपलब्ध करून देणे.
4) प्रहार दिव्यांग संघटनेचा प्रतिनिधी ग्रामपंचायत मधील समिती व कमिटीमध्ये प्रतिनिधी म्हणून नेमणूक करून घेणे.
5) ग्रामपंचायत मध्ये कामगार भरती मध्ये दिव्यांग व्यक्तीला तीन टक्के आरक्षण द्वारे काम उपलब्ध करून देणे. [ads id="ads2"]
वरील दिव्यांग बांधवांच्या सर्व मागण्या ग्रामपंचायत ने त्वरित मंजूर करून देणे यासंदर्भात प्रहार दिव्यांग क्रांती संघटना रावेर तर्फे निवेदन देण्यात आले.
निवेदन देते प्रसंगी, उपस्थित प्रहार दिव्यांग क्रांती संघटना रावेर तालुका अध्यक्ष विनोद कोळी प्रहार दिव्यांग उपाध्यक्ष शशिकांत पाटील, दिव्यांग उपाध्यक्ष जितेंद्र कोळी ,कार्याध्यक्ष दिनेश सैमिरे, उपसरपंच अशोक पाटील, ग्रामसेवक एमडी पाटील, ग्रामपंचायत सदस्य, राहुल पाटील गुरुजी ,मोहम्मद पिंजारी ,बाळू सोनार, देविदास तायडे, ग्रामपंचायत शिपाई ,रणजीत तायडे, राहुल तायडे. इत्यादी मान्यवरांची उपस्थिती होती.
हेही वाचा :- ग्रामसेवकाला अडीच हजाराची लाच घेतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागा कडून रंगेहाथ अटक : जळगाव जिल्ह्यातील घटना


