यावल प्रतिनिधी (फिरोज तडवी)
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत कंत्राटी तत्वावर कार्यरत कर्मचारी दहा ते बारा वर्षांपासून प्रामाणिक पणे अखंडीत मनरेगाची कामे करत आहे.वेळोवेळी वरिष्ठांनी दिलेली कामे व जवाबदारी व्यवस्थीत पणे पार पाडत असून वेळेवर पूर्ण करित आहे. [ads id="ads1"]
त्याच प्रकारे कोविड १९ अशा महामारीच्या काळात सुद्धा स्वतःचा जीवाची पर्वा न करता कोणत्याही शासकीय सुविधा नसतांना ही प्रत्येक मजुरांना मोठ्या प्रमाणात काम उपलब्ध करून दिले.असे असतांना सुद्धा कंत्राटी कर्मचारी यांचा मानधनात कोणत्याही प्रकारची वाढ झालेली नाही.असे असतांना सुद्धा योजनेमध्ये काम करणारे काही निवडक कर्मचारी हे राज्य निधी असोशियन मधूनच नियुक्तीसह मानधन घेत आहे काही कर्मचारी कंपनी मार्फत काम करत आहे. [ads id="ads2"]
एकाच योजनेत काम करित असतांना वेगवेगळ्या निधीतून त्यांची निवड करने व मानधनात तफावत असणे हे संयुक्तिक नाही .त्यामुळे आम्हाला ही मानधन नियुक्ती राज्य अशोशिएशन मधूनच देण्यात यावी .आमच्या प्रमुख मागण्या पूर्ण न झाल्यास नाईलाजाने संपूर्ण महाराष्ट्र भर टप्याटप्याने आंदोलन तीव्र करण्यात येईल .याचा फटका मनरेगा च्या मजुरांना बसू शकते याची सर्वस्व जवाबदारी शासनाची राहील .अशा इशारा मनरेगा कंत्राटी कर्मचारी संघटना यांचा कडून देण्यात आला आहे. यावल पंचायत समितीच्या रोजगार हमी योजनेच्या कार्यालयात आज लेखणी बंद आंदोलन सुरू असल्याने रोजगार हमी कार्यालय ओस पडल्या चे दिसून येते, आंदोलनात सहभागी कर्मचारी विशाल रमेश राऊत, समाधान नामदेव बोरसे, हितेंद्र मंगा सोनवणे, संतोष पुंडलिक पाटील, किशोर सुरेश कोळी अनील ढाके यांच्यासह बहूसंख्य कर्मचारी उपस्थित होते,