आज दिनांक 11 फेब्रुवारी च्या दिवसभरातील ठळक बातम्या

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

🎯 महाराष्ट्र सह संपूर्ण भारतातील घडामोडी वाचा 2 मिनिटात

▪️ भारतात पहिल्यांदाच काश्मीरमध्ये लिथीयमचा साठा आढळला, जियोलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाची माहिती दिली, देशात पहिल्यांदाच लिथीयमचा साठा सापडला


▪️ येत्या 14 फेब्रुवारीला काऊ हग डे साजरा करण्याचे आवाहन मागे: सोशल मीडियावर युझर्सनी केले होते ट्रोल


▪️ आधी कायद्याचे भय दाखवून उद्योजकांना त्रास दिला जायचा: PM मोदींची काॅंग्रेसवर टीका, म्हणाले - आम्ही जाॅब क्लस्टर्सच्या पाठिशी

 [ads id="ads1"]  

▪️ CM गेहलोत यांनी वाचले जुनेच बजेट भाषण: 6 मिनिटे जुने मुद्दे वाचत राहिले, अध्यक्षांनी मुख्यमंत्र्यांची चूक कार्यवाहीतून वगळली


▪️ खासदार रजनीताई पाटील यांचं निलंबन, सभागृहातील विरोधकांच्या गोंधळाचा व्हिडीओ व्हायरल केल्याप्रकरणी कारवाई 


▪️ सूर्याचा मोठा भाग तुटला: जेम्स वेब स्पेस टेलिस्कोपमध्ये कैद झाली घटना, संशोधक चिंतेत; संवाद प्रभावित होण्याची शक्यता


▪️ दहावी-बारावी परीक्षांमधील पेपरफुटी टाळण्यासाठी महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाने मोठा निर्णय, प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांना दहा मिनिटे आधी मिळणार नाही

 [ads id="ads2"]  

▪️ आग्रा किल्ल्यावर शिवजयंती होणार: महाराष्ट्र सरकार सहआयोजक होण्यास तयार; शिवप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण


▪️ कलाटे, दवेंची बंडखोरी कायम: चिंचवडमध्ये तिरंगी लढत; उद्धव ठाकरेंची शिष्टाई, सचिन अहिर यांनी काढलेली समजूत निष्फळ


▪️ शरद पवारांचा मोदी सरकारला इशारा: केंद्र शासनाने आणलेला वीज निर्मिती कायदा कुठल्याही परिस्थितीत होऊ देणार नाही


▪️ राष्ट्रवादी कॉंग्रेसचे मोहळचे आमदार यशवंत माने यांना सायबर भामट्याने सेक्सटॉर्शनच्या जाळ्यात अडकवून लाखो रुपयांची खंडणी उकळण्याचा केला प्रयत्न 


▪️ भारत-ऑस्ट्रेलिया नागपूर कसोटी: दुसऱ्या दिवशी भारताला 144 धावांची आघाडी; रोहितचे शतक तर जडेजा-अक्षरची अर्धशतकी खेळी


▪️ एकता कपूरचा ALTBalajiच्या प्रमुखपदाचा राजीनामा: आई शोभा कपूरनेही सोडले पद, इतर कामांवर लक्ष देण्यासाठी घेतला निर्णय

📣 हिंडेनबर्ग-अदानी प्रकरण - गुंतवणूकदारांच्या हितासाठी व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी सुप्रीम कोर्टाचे सेबीला निर्देश तसेच तज्ज्ञ समिती नेमण्याचे संकेत दिले तर पुढील सुनावणी 13 फेब्रुवारी रोजी होणार


📣 जम्मू आणि काश्मीरच्या रियासी जिल्ह्यात लिथियमचे मोठे साठे आढळून आले आहेत. देशातील हा पहिला लिथियमचा साठा असल्याचे जियोलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाने म्हटले आहे 


📣 आधी कायद्याचे भय दाखवून उद्योजकांना त्रास दिला जायचा अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांनी काॅंग्रेसवर केली म्हणाले - आम्ही जाॅब क्लस्टर्सच्या पाठिशी


📣 केंद्र शासनाने आणलेला वीज निर्मिती कायदा कुठल्याही परिस्थितीत होऊ देणार नाही असा इशारा शरद पवार यांनी मोदी सरकारला केला आहे


📣 एकता कपूर ALT Balaji च्या प्रमुखपदाचा राजीनामा देणार तर आई शोभा कपूरनेही सोडले पद इतर कामांवर लक्ष देण्यासाठी हा घेतला निर्णय घेतला असे त्यांनी म्हटले 


📣 मुकेश अंबानी उत्तर प्रदेशात 1 लाख नोकऱ्या देणार, उत्तर प्रदेशात 75 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार अशी घोषणा मुकेश अंबानी यांनी केली 

 

📣 दहावी-बारावी परीक्षांमधील पेपरफुटी टाळण्यासाठी महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाने घेतला मोठा निर्णय त्यामुळे विद्यार्थ्यांना आता प्रश्नपत्रिका दहा मिनिटे आधी मिळणार नाही. 


📣 गोकूळने दूधाच्या दरात मोठी वाढ केली यामध्ये म्हशीच्या दूध दरामध्ये 3 रुपये वाढ होऊन 72 रूपये लीटर तर गायीच्या दुधात 2 रुपयांची वाढ होऊन 56 रूपये लीटर दराने मिळणार

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!