कोळन्हावी फाट्यावर झालेल्या डंपरनक्या धडकेत यावल तालुक्यातील दोघ तरुणांचा मृत्यू

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे


 यावल ( प्रतिनिधी ) फिरोज तडवी

 तालुक्यातील जळगाव मार्गावरील कोळन्हावी फाट्यावर झालेल्या मोटरसायकलला अज्ञात डंपरच्या भिषण अपघातात  गंभीर जखमी झालेल्या ईस्माइल तडवी  याचा देखिल मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. [ads id="ads1"]  

 काल दिनांक १० फेब्रुवारी रोजी सायंकाळी कोळन्हावी फाटया जवळ झालेल्या मोटरसायकल व डंपरच्या  भिषण अपघातातील गंभीर जखमी असलेल्या ईस्माइल हबीब तडवी या तरूणाचे जळगाव येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता रात्री १२ , ३० वाजेच्या सुमारास त्याची प्राणज्योत मावळली.    [ads id="ads2"]                                                                            या अपघात अमोल राजेन्द्र पाटील , वय २८ वर्ष, राहणार सावखेडा सिम, ह .मु.जळगाव या तरुणाचा घटनास्थळीच मृत्यु झाल्याने या अपघात दोघ मरण पावले आहे . यावल पोलीसांनी रात्री उशीरा या भिषण अपघातास कारणीभुत असलेल्या डंपर क्रमांक एमएच १७ बी डी ३४६८या वाहनास पोलीसांनी   घटनास्थळा वरून ताब्यात घेतले असुन , या डंपर वरील चालक मात्र फरार झाला असुन पोलीस सुत्रांकडुन सांगण्यात आले . या संदर्भात यावल पोलीस ठाण्यात अज्ञात डंपर चालका विरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असुन , पुढील तपास पोतीस उपनिरिक्षक प्रदीप बोरूडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करीत आहे .     ईस्माइल हबीब तडवी, वय ३० वर्ष , राहणार सावखेडा सिम तालुका यावल हा मोलमजुरी करून आपल्या कुंटुंबाचा उदरर्निवाह करीत होता त्यांच्या कुटुंबात पत्नी व एक लहान मुलगी असा परिवार आहे तर अपघातात मरण पावलेल्या अमोल राजेन्द्र पाटील हा पाटील कुंटुंबातील एकुलता एक मुलगा होता .                           मयत तडवी हे जळगाव येथे अमोल पाटील कडे घराच्या रंग कामासाठी गेला होता , दरम्यान घराचे  रंगकाम आटोपुन हे दोघ त्यांच्याकडील  मोटरसायकल क्रमांक१९ डी बी २७४६ ने किमगाव  कडे येत असतांना आज दिनांक १० फेबूवारी शुक्रवारी रोजी सायंकाळी ५ते ६ वाजेच्या सुमागस  किनगाव कडुन सुसाट वेगाने जाणाऱ्या डंपरने धडक देवुन झालेल्या भिषण अपघातात अमोल राजेन्द्र पाटील या तरूणाचा जागीच मृत्यु झाला तर ईस्माईल हबीब तडवी हा तरूण गंभीर झाला असता त्याचे जळगाव येथे उपचारा दरम्यान मृत्यु झाले.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!