आज दिनांक 14 फेब्रुवारी च्या दिवसभरातील ठळक बातम्या

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

🎯 महाराष्ट्र सह संपूर्ण भारतातील घडामोडी वाचा 2 मिनिटात

📣 सध्या जगभरातील मंदीच्या शक्यतेमुळे अनेक मोठ्या कंपन्या कर्मचाऱ्यांना काढून टाकत असून, मेटा कंपनी आगामी काळात आणखी काही कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकू शकते अशी शक्यता वर्तवली जात आहे.


📣 सुप्रीम कोर्टात आज महत्वाचा दिवस - महाराष्ट्रात ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्या सत्तासंघर्षाच्या प्रकरणात आज सुनावणी होणार आहे 

 

📣 नवीन पेन्शन योजना रद्द करून जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी म्हणून, जुन्या पेन्शनसाठी १७ लाख कर्मचाऱ्यांचा १४ मार्चपासून बेमुदत संपाचा इशारा. 

 [ads id="ads1"]  

📣 सुप्रसिद्ध अभिनेत्री प्रिया बेर्डे यांनी २०२० ला राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश केला होता मात्र, आता प्रिया बेर्डेयांनी भारतीय जनता पार्टीत देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितित प्रवेश केला. 


📣 मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे आयोजन केले असून, १४ ते १७ फेब्रुवारी दरम्यान हा चित्रपट महोत्सव चालणार आहे. 


📣 अदानी-हिंडेनबर्ग प्रकरणाबाबत मोठी अपडेट, नियामक यंत्रणेवर तज्ञांच्या पॅनेलची स्थापना करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या प्रस्तावास केंद्र सरकारची सहमती


📣 राज्याच्या तापमानात बदल झाला असून, उत्तरेत बर्फवृष्टी आणि पाऊस झाल्याने राज्याचा पारा पुन्हा घसरला यामधे नाशिकच्या निफाडमध्ये निचांकी 5.5 अंशांची नोंद करण्यात आली.


▪️ 'सेबी'ला मजबूत करण्यासाठी स्थापन होणार समिती: केंद्र सुप्रीम कोर्टाला म्हणाले - तज्ज्ञांची नावे सोपवू; अदानी वादात भासली गरज

 [ads id="ads2"]  

▪️ जम्मू-काश्मीरच्या सीमांकनाला आव्हान देणारी याचिका फेटाळली: सर्वोच्च न्यायालयाने म्हटले - या निर्णयाचा 370 शी संबंध नाही, ते प्रकरण घटनापीठात


▪️ LTTE प्रमुख प्रभाकरन जिवंत व ठणठणीत: काँग्रेस नेत्याचा दावा - लवकरच जगापुढे येईल; श्रीलंकेने 2009 मध्ये केले होते मृत घोषित


▪️ प्रियांका गांधींचा जम्मू-काश्मीर बुलडोझर मोहिमेवर आक्षेप: म्हणाल्या- घटनात्मक अधिकार बहाल करण्याची मागणी करणाऱ्यांवर अत्याचार


▪️ महाराष्ट्र देशाचे ग्रोथ इंजिन: PM मोदींचे 5 ट्रिलीयन डाॅलर इकाॅनाॅमीचे उदीष्ट, महाराष्ट्राचे सर्वाधिक योगदान असेल - CM शिंदे


▪️ शरद पवारांशी चर्चा करूनच पहाटेचा शपथविधी: देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट; म्हणाले - खातेवाटपही ठरले होते, जुना व्हिडीओ समोर


▪️ फडणवीसांच्या गौप्यस्फोटावर पवारांची प्रतिक्रीया: 'देवेंद्र' सुसंस्कृत, सुज्ञ माणूस, असत्याचा आधार घेवून ते वक्तव्य करतील असं वाटलं नव्हतं


▪️ शुभमन गिल ठरला ICC प्लेयर ऑफ द मंथ: वनडे क्रिकेटमध्ये द्विशतक, टी-20 मध्ये शतक; सिराज आणि कॉनवे टाकले मागे


▪️ WPL साठी खेळाडूंचा लिलाव: स्मृती मानधना पहिली कोट्यधीश, 3 खेळाडू 3 कोटींपेक्षा जास्त, 4 देशांचे कर्णधार अनसोल्ड


▪️ इयोन मॉर्गनने क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून घेतली निवृत्ती: 2019 मध्ये इंग्लंडला जिंकून दिले वर्ल्डकप, SAT-20 मध्ये खेळला शेवटचा मॅच


▪️ क्रिकेटपटू हार्दिक पंड्या पुन्हा बोहल्यावर: व्हॅलेंटाइन डेला पत्नी नताशासोबतच करणार लग्न; 3 वर्षांपूर्वी केले होते कोर्ट मॅरेज


▪️ 'जवान'च्या शूटिंगसाठी चेन्नईत पोहोचला शाहरुख खान: नयनताराच्या घराबाहेर दिसला, चाहत्यांना दिला फ्लाइंग किस


#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!