दोन जिवलग मित्रांचा एकाच दिवशी दुर्दैवी मुत्यू : रावेर येथील समाजमनात हळहळ

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

मयत सुनिल बारी व सुनिल राजपुत
मयत सुनिल बारी व सुनिल राजपुत

रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा) रक्ताच्या नात्याला मोल नाही आणि त्याही पेक्षा मित्रत्वाचे (friendly relationship) नाते आहे, कृष्णाचे आणि सुदामाचे नाते असलेल्या महाभारतात देखिल मैत्री हि अनमोल असल्याचे अधोरेखित झालेले आहे.परमेश्वराने देखिल मैत्रीच्या नात्याला आपल्या हृदयात आगळे वेगळे स्थान दिले होते. मैत्री जिवाच्या पलीकडे असते, अतूट असते हे दर्शवणारी हृद्यस्पर्शी घटना रावेर तेथे शनिवारी दिनांक 11फेब्रुवारी रोजी घडली. दोन जिवलग मित्राचा (Close friends) एकाच दिवशी मृत्यू (death)झाल्याने रावेर शहरात या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.  [ads id="ads1"]  

रावेर येथील सुनिल रामदास पाटील (बारी) वय- ५० हे आपल्या परिवारा सोबत ओंकारेश्वर याठिकाणी गेले होते.शनिवारी शनिवारी दिनांक 11फेब्रुवारी रोजी दुपारी अचानक त्यांच्या छातीत दुखू लागल्याने,त्यांना उपचारासाठी दवाखान्यात दाखल केले,धावपळ सुरू असताना,त्यांची हृदयविकाराने प्राणज्योत मावळली,जेव्हा सुनिल बारी यांना अटॅक आला, त्यांच्यावर तातडीने उपचार व्हावे यासाठी रावेर येथून त्यांचा मित्र सुनिल राजपुत हे प्रयत्न करत होते. प्रयत्न करूनही सुनिल बारी यांना वाचवता आले नाही ही बाब त्यांचे मित्र सूनिल पोलादसिंग राजपूत (रा. प्रशिक नगर उटखेडा रोड, रावेर) यांना बैचेन करत होती. [ads id="ads2"]  

संध्याकाळच्या सुमारास त्याना अस्वस्थपणा वाटू लागल्यावर दवाखान्यात नेण्यात आली, यानंतर सायंकाळी पावणे सात वाजेला डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.एकाच दिवशी दोन जिवलग मित्राचा जीव गेल्याने, रावेर शहरात शोक व्यक्त केला जात आहे.

मयत सुनील बारी यांच्या पश्चात परिवार आई, पत्नी, मुलगा मुलगी नातवंडे असा परिवार आहे. तर सूनील राजपूत यांच्या पश्चात पत्नी, तीन मुली परिवार आहे.मित्राचा जीव गेल्याची बातमी ऐकून धक्का बसलेल्या जिवलग मित्राने सुद्धा आपले प्राण त्यागल्याची घटना समाज मन सुन्न करणारी आहे.या सदर घटनेने संपूर्ण रावेर शहरात शोककळा पसरली आहे.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!