तसेच दिव्यांग बांधवांची पूर्व तपासणी शिबिर घेऊन त्यांना साहित्य वाटपाच्या कार्यक्रमासाठी त्यांची नाव नोंदणी करण्यात आली. त्यामध्ये अस्थिविंग व्यक्ती कर्णबधिर, मूकबधिर, आणि दृष्टी हीन, असे अनेक प्रकारचे दिव्यांग बांधवांची पूर्व तपासणी ठिकाणी उपस्थिती होती.[ads id="ads2"]
तसेच ग्रामीण रुग्णालय रावेर येथे सत्कार समारोह घेण्यात आला. त्या ठिकाणी प्रहार दिव्यांग क्रांती संघटना रावेर तालुका अध्यक्ष , विनोद हरी कोळी. आणि प्रहार दिव्यांग रावेर तालुका कार्याध्यक्ष, दिनेश सैमिरे, यांचा सत्कार लोकसभा नवनिर्वाचित खासदार रक्षाताई खडसे यांनी केला. व भाजपा दिव्यांग रावेर तालुका अध्यक्ष, रजनीकांत बारी यांचा सत्कार सुद्धा खासदार रक्षाताई खडसे यांनी केला.
दीपक नगरे, यांचा सुद्धा सत्कार त्या ठिकाणी करण्यात आला. त्या ठिकाणी उपस्थित मान्यवर भाजपा जिल्हाध्यक्ष, पद्माकर महाजन सुरेश धनके, Zp सदस्य नंदू महाजन, माजी सभापती जितू पाटील, हरिलाल कोळी, तहसीलदार उषा राणी देवगुणे गटविकास अधिकारी, दिपाली कोतवाल तसेच प्रहार दिव्यांग क्रांती संघटना पदाधिकारी प्रहार दिव्यांग अध्यक्ष विनोद कोळी, तालुका उपाध्यक्ष शशिकांत पाटील ,तालुका उपाध्यक्ष जितेंद्र कोळी, तालुका सल्लागार विश्वनाथ भिल्ल, तालुका संघटक आनंदा कोळी ,सुलवाडि शाखाप्रमुख गोपाल कोळी, तालुका सचिव भागवत शेलोळे ,तालुका सहसंघटक भरत पाच पोळे ,तालुका सहसचिव संतोष कोळी .इत्यादी सर्व प्रहार दिव्यांग क्रांती संघटना पदाधिकारी यांनी शिबिरामध्ये उपस्थित असलेल्या सर्व दिव्यांक बांधवांना चांगल्या प्रकारे मदत केली .आणि शिबीर संपेपर्यंत उपस्थिती दर्शवली.



