जळगाव येथे २ व ३ एप्रिल रोजी ३ रे राज्य स्तरीय बौद्ध साहित्य संमेलन होणार - प्रा.भरत शिरसाठ

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे


जळगाव (सुवर्ण दिप वृत्तसेवा) :- बौद्ध साहित्याचा प्रचार , प्रसार करणे , बौद्ध साहित्तिकाना स्वतंत्र विचारमंच उपलब्ध व्हावा , राष्ट्रप्रेम , बंधूभाव निर्माण व्हावा या करीता दिनांक दोन व तीन एप्रिल रोजी जळगाव येथे 3 रे राज्य स्तरीय बौद्ध साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे अशी माहिती संमेलनाचे स्वागताध्यक्ष प्रा भरत शिरसाठ यांनी दिली. [ads id="ads1"]  

           जळगाव येथील पदमालय विश्रामगृहात नुकतीच एक बैठक या बाबत घेण्यात आली तेंव्हा मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

            प्रा शिरसाठ यांनी पुढं सांगितले की या बाबत आतापर्यंत सहा राज्यस्तरीय व तीन जिल्हास्तरीय सभा घेण्यात आल्या , शहर व तालुका समिती स्थापन केली आहे , बौद्ध साहित्य प्रसार संस्था या कामी राज्यभरात विविध साहित्तीक , कवि , विचारवंत यांचेशि संपर्क साधुन आहे , त्यास उत्तम प्रतिसाद मिळत आहे. [ads id="ads2"]  

             बैठकीच्या अध्यक्षस्थानी जनक्रांति आंदोलनचे अध्यक्ष मुकुंद सपकाळे होते त्यांनी आपल्या भाषणात सांगितले की संमेलनाच्या यशस्वीते करीता लवकरच व्यापक बैठक घेतली जाईल तसेच गावोगावी प्रचार करण्यात येईल

          प्रसिद्ध साहित्तीक जयसिंग वाघ , प्रा हरिश्चंद्र सोनवणे , प्रा रामभाऊ सोनवणे यांनी सुद्धा आपले मनोगत व्यक्त केले.  सूत्रसंचालन डॉ अशोक सैंदाने , प्रास्ताविक प्रा सतीश मोरे , आभार बाबूराव वाघ यांनी केले

      दिलीप सपकाळे , मिलिंद सोनवणे , समाधान सोनवणे , विनोद रंधे , प्रितलाल पवार , युवराज वाघ , देवीदास गाढ़े आदिंसह कार्यकर्ते मोठ्या संखेने हजर होते

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!