अनेक व्यक्तींमध्ये सध्या चारित्र्य, राष्ट्रभक्ती, सेवा, साहस, श्रम, त्याग या गोष्टी व अस्मितेची विस्मृती होताना दिसत आहे.यातून मार्ग काढण्यासाठी बालवयातच संस्कार देऊन मातृभूमीबद्दल प्रेम जागृत व्हावे व नवी पिढी ही विचारक्षम व्हावी.त्यांचे उज्वल भवितव्य घडावे. यासाठी राष्ट्रसेविका समिती नेहमीच प्रयत्नशील असते. [ads id="ads2"]
त्या अंतर्गत भुसावळ येथून सौ रुपाली देवरे, सौ योगिता स्वामी,तसेच रावेरच्या सौ.कांता पटेल,सौ दिपाली महाजन, ज्योती तारकस, सौ हर्षाली महाजन,अश्विनी गाढे यांचे सहकार्य लाभले. या प्रसंगी सर्वप्रथम शाळेचे मुख्याध्यापक श्री राजकुमार जैन सर व उपस्थित महिला यांच्या शुभहस्ते सरस्वती पूजन करण्यात आले.सूत्रसंचालन शाळेतील शिक्षिका श्रीमती उषा चव्हाण यांनी केले व आभार सौ.ललिता राणे यांनी मानले.अशा प्रकारे सदरील उपक्रम उत्साहात संपन्न झाला.


