यावल ( सुरेश पाटील) आज सोमवार दि.13 रोजी सरदार वल्लभभाई पटेल इंग्लिश मिडियम स्कूल मधील विद्यार्थ्यांनी गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त एक कार्यक्रम सादर केला.सर्वात प्रथम शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.शिला तायडे मॅडम व . प्रशांत फेगडे सर तसेच सौ. कुंदा नारखेडे मॅडम व धनश्री महाजन मॅडम यांसोबत लेझीम पथकातील विद्यार्थ्यांनी यावल येथील रेणुका माता मंदिरापासून श्री गजानन महाराज मंदिरपर्यंत लेझीम पथकाची मुलांची भव्य रॅली काढण्यात आली.[ads id="ads1"]
विद्यार्थ्यांनी कार्यक्रमानिमित्त राम,लक्ष्मण सीता व हनुमान यांच्या भूमिका साकार केल्या.संस्थाचालक राजेंद्र महाजन सर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षकवृंद व कर्मचारीवर्ग यांच्या समवेत आजचा कार्यक्रम अत्यंत उत्साहात, शांततेत व आनंदात तसेच यशस्वीरित्या पार पडला.


