जिल्हाधिकारी कारवाईचे निर्देश देणार आहेत किंवा नाही...?
यावल (सुरेश पाटील) यावल तालुक्यात तहसीलदार महेश पवार यांच्या कार्यक्षेत्रात यावल तहसील अभिलेख शाखेत तसेच सर्कल,तलाठी, कार्यालयासह धान्य गोदामात अनधिकृतपणे खाजगी उमेदवाराकडून शासनाची व नागरिकांची शुद्ध दिशाभूल करून शासकीय कामकाज सर्रासपणे सुरू आहे यात दररोज तालुक्यातील नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात आर्थिक लुट होऊन फार मोठी आर्थिक उलाढाल होत आहे याबाबत जळगाव जिल्हाधिकारी आणि आणि फैजपूर भाग प्रांताधिकारी कारवाईचे निर्देश देतील का...? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. [ads id="ads1"]
महसूल विभागाकडे देशातील नागरिकांचे व शासनाचे जमिनी विषयक महत्त्वाचे कागदपत्रे,दस्तऐवज, शासन निर्णय,महत्त्वाच्या फाईल या तलाठी कार्यालय तसेच मंडळ अधिकारी, अभिलेख शाखा कार्यालयात असतात परंतु बहुतांशी तलाठी व मंडळ अधिकारी यांनी आपला कामाचा बोजा कमी होण्यासाठी सोयीनुसार व आपल्या मर्जीने कामे होण्यासाठी मदतनीस म्हणून अनधिकृत खाजगी उमेदवार कार्यालयात बिनधास्तपणे तैनात/नियुक्त केले आहे. (खाजगी उमेदवारांना मानधन कोण देतो?आणि किती मानधन मिळते ? किंवा ते आपण करीत असलेल्या कामाचा मोबदला नागरिकांकडून अनधिकृत वसूल करीत आहेत का ? ) या खाजगी नोकरांकडे कार्यालयातील महत्वाचे प्रकरणाच्या दस्तऐवजाच्या कामकाजासह आर्थिक व्यवहाराच्या पावती देवाण-घेवाणसह कागदपत्रांच्या चाव्या दिल्या जात असल्याने आणि सर्कल तलाठी व संबंधित अधिकृत शासकीय कर्मचारी हे फक्त स्वाक्षरी करण्यासाठी महत्त्वाची भूमिका निभावत असल्याने बहुतांशी कामे सर्कल,तलाठी, किंवा संबंधित शासकीय लिपिक यांच्या ऐवजी हे खाजगी नोकरी करत आहेत शेतकरी,जेष्ठ,नागरिक विद्यार्थ्यांना,महिलांना, अपंगांना व खाजगी नोकराकडे कामासाठी हेलपाटे मारावे लागत असून अनेक वेळा कामाच्या मोबदल्यात शासकीय कामकाजाची माहिती नसलेल्या लोकांकडे सोयीनुसार पैशांची मागणी सुद्धा करत असतात याचा त्रास नागरिकांना होत आहे. [ads id="ads2"]
शिवाय शासनाचे महत्त्वाचे दस्तऐवज व कागदपत्रे गहाळ होण्याचा व हरविण्याचा प्रकार काही ठिकाणी झाल्याने नागरिकांच्या या संदर्भात तक्रारी आहेत, खाजगी नोकराच्या हातात शासकीय दस्तऐवज देणे ही बाब गोपनीयतेचा भंग करणारी असल्याने यापुढे तलाठी किंवा मंडळ अधिकारी किंवा अभिलेख शाखेत आपल्या कार्यालयात अनधिकृत खाजगी उमेदवार ठेवल्याने शिस्तभंगाची कारवाई अद्याप न झाल्याने यावल तालुक्यातील नागरिकांमध्ये अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
अशाप्रकारे तलाठी अगर मंडळ अधिकारी यांनी कामासाठी अनधिकृत खाजगी उमेदवार ठेवल्याने तत्कालीन ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी शिस्तभंग व कर्तव्यात कसूर करण्याच्या कारवाईचे आदेश दिले होते आणि आहेत.अशाप्रकारे यावल तालुक्यासह जळगाव जिल्हा महसूल विभागात काही ठिकाणी अनधिकृत खाजगी उमेदवार जे कार्यरत आहेत त्याबाबत कारवाईचे निर्देश देणार आहेत किंवा नाही? असा प्रश्न सुरेश जगन्नाथ पाटील अध्यक्ष- भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन न्यास(आ.अण्णा हजारे कृत) यांनी उपस्थित केला आहे.


