आज दिनांक 13 फेब्रुवारी च्या दिवसभरातील ठळक बातम्या

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

🎯 महाराष्ट्र सह संपूर्ण भारतातील घडामोडी वाचा 2 मिनिटात

▪️महिला T20 विश्वचषक, भारताचा पाकिस्तानवर 5 वा विजय: पहिला सामना 7 विकेट्सने जिंकला, जेमिमा रॉड्रिग्जचे अर्धशतक


▪️ काँग्रेस बॉर्डरवर रस्ते बांधण्यास घाबरत होती: दिल्ली-मुंबई एक्सप्रेस-वेच्या उद्घाटनावेळी मोदी म्हणाले - त्यांना सैन्याच्या शौर्यावर विश्वास नव्हता


▪️ 'अयोध्या'वर निर्णय देणारे न्यायाधीश झाले राज्यपाल: अब्दुल नझीर आंध्र प्रदेशाचे राज्यपाल, खंडपीठातील दुसऱ्या न्यायाधीशाला मिळाले मोठे पद

 [ads id="ads1"]  

▪️ दिल्ली महापौर निवडणुकीसाठी नवीन तारखेची घोषणा: 16 फेब्रुवारीला बैठक, LG सक्सेना यांनी दिली मंजुरी


▪️ झोमॅटोची देशातील 225 शहरांतील सेवा बंद: डिसेंबर तिमाहीत कंपनीला 346.6 कोटी रुपयांचा तोटा, परंतू महसूलात वाढ


▪️ राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर: रमेश बैस आता महाराष्ट्राचे नवे राज्यपाल, 13 राज्यांचेही बदलले राज्यपाल


▪️ रमेश बैस महाराष्ट्राचे नवे राज्यपाल: अटलबिहारी वाजपेयी सरकारमध्ये सांभाळली मंत्रीपदाची जबाबदारी; नगरसेवक ते आतापर्यंतचा प्रवास

 [ads id="ads2"]  

▪️ निवडणुकीपूर्वीच घोषणांचा पाऊस: फडणवीस म्हणाले- मुख्यमंत्र्यांनी मला चावी दिली, बंजारा समाजासाठी तिजोरी उघडण्यास सांगितले


▪️ एकनाथ शिंदे यांनी घेतली गिरीश बापट यांची भेट: 'कसब्याची चिंता करू नका, मी इथे बसलोय'; बापटांचे मुख्यमंत्र्यांना आश्वासन


▪️ भाजपने 2014 पूर्वीच युती तोडली: काॅंग्रेससोबत जाण्यास मजबूर केले; उद्धव ठाकरेंचे मोठे विधान, म्हणाले - मोदींनी मुंबईत 'पोळी' भाजली


▪️ मुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला: संजय राठोड यांच्या संकटकाळात काही लोकांनी हात वर केले; आम्ही खांबासारखे उभे राहीलो


▪️ वॉर्नर दिल्ली कसोटीतून बाहेर होऊ शकतो: पहिल्या कसोटीत स्पिनर्ससमोर ठरला फेल; ऑस्ट्रेलिया तीन स्पिनर्ससह उतरू शकतो


▪️ सिद्धार्थ-कियाराच्या मुंबईतील घराचा व्हिडिओ आला समोर: 70 कोटींच्या अपार्टमेंटमधून कपल करणार नव्या आयुष्याची सुरुवात


📣 परीक्षेत गैरप्रकार केल्यास दहा कोटींचा दंड आणि थेट जन्मठेपेची शिक्षा होणार, असा निर्णय उत्तराखंड सरकारने घेतला आहे - स्पर्धा परीक्षांमधला कॉपी प्रकार रोखण्यासाठी कठोर कायदा तयार करण्यात आला आहे - असे उत्तराखंड सरकारने म्हटले आहे 


📣 (LIC) भारतीय आयुर्विमा महामंडळात AAO च्या 300 जागांसाठीचे पूर्व परीक्षेचे हॉल तिकीट जाहीर झाले आहे. 


📣 भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळवला जाणार, या सामन्यात वेगवान गोलंदाज जयदेव उनाडकटला संघातून मुक्त असणार 


📣 विश्व भारती विद्यापीठ, शांतिनिकेतन आणि नोबेल पारितोषिक विजेते अमर्त्य सेन यांना झेड प्लस सुरक्षा देण्यात आली.


📣 पुणे-करांसाठी आनंदाची बातमी - पुणे मार्केट यार्डातील घाऊक बाजारात आवक वाढल्याने कांदा-बटाट्याच्या दरात घट, अन्य फळभाज्यांचे दर स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.


📣 काल चार उच्च न्यायालयांमध्ये मुख्य न्यायाधीशांची नियुक्ती करण्यात आली. अशातच आणखी काही उच्च न्यायालयातील पदांच्या नियुक्त्या करण्यात येणार अशी माहिती कायदा मंत्री किरेन रिजिजू यांनी केली

  

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!