🎯 महाराष्ट्र सह संपूर्ण भारतातील घडामोडी वाचा 2 मिनिटात
📣 2023 च्या जानेवारी महिन्यात 1,55,922 कोटी रुपयांचा जीएसटी जमा झाला असल्याची माहिती अर्थ मंत्रालयाने दिली आहे, तर एप्रिल 2022 मध्ये 1.68 लाख कोटी रुपयांचा जीएसटी जमा झाला होता.
📣 तुरुंगात असलेल्या गरिबांना बेलसाठी आणि दंडाची रक्कम भरण्यासाठी गरज असल्यास आर्थिक मदत केली जाणार, अशी घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली.
📣 ज्येष्ठ नागरिकांसाठी खुशखबर, तीस लाख रुपयेपर्यंतची रक्कम असणार करमुक्त त्यामुळे ज्येष्ठ नागरिक गुंतवणूक करू शकणार, त्यांना आठ टक्के दराने व्याज मिळणार.
[ads id="ads1"]
📣 सर्वसामान्यांना पुन्हा महागाईची झळ, सर्वच डाळी, कडधान्याचे भाव शंभरीपार, तर होळीपर्यंत असेच दर चढते राहणार आहेत - असे तज्ञांचे म्हणणे आहे
📣 1947 ला भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर, पहिल्यांदाच महिला अर्थमंत्र्यांनी महिला राष्ट्रपतींना अर्थसंकल्प सादर केला
📣 तुकाराम महाराज हे महान संत असून तेच आपले आदर्श आहेत, असं म्हणत धीरेंद्र शास्त्री यांनी हात जोडून महाराष्ट्राची माफी मागितली आहे.
📣 शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी - शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढवण्याची मोठी गुंतवणूक होणार , त्यामुळे आता शेतकऱ्यांचे उत्पादन वाढणार
[ads id="ads2"]
📣 केंद्रीय अर्थमंत्री यांची मोठी घोषणा - सर्व शासकीय कार्यालयात आता एकमेव ओळखपत्र असणार
▪️ 8 वर्षांनी कर सवलतीची मर्यादा वाढली: गरिबांना आणखी वर्षभर मोफत धान्य, 50 नवे एअरपोर्ट-हेलिपॅड बनणार : अर्थमंत्री निर्मला सीतारामन
▪️ शेतकरी कर्जासाठी दीड लाख कोटींची वाढीव तरतूद: स्टार्टअपसाठी स्वतंत्र निधी, 3 वर्षांत 1 कोटी लोकांना नैसर्गिक शेतीशी जोडण्याची योजना
▪️ हक्काचे घर घेणे सोपे: बजेटमधून आनंदवार्ता, पंतप्रधान घरकुल योजनेच्या खर्चात 66 टक्के वाढ, 79,000 कोटींच्या निधीची घोषणा
▪️ शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण घोषणा: भरडधान्यांसाठी विशेष हब, 20 लाख कोटींच्या कृषी कर्जाचे उद्दीष्ट, कृषी स्टार्टअप्ससाठी कृषी वर्धक निधी
▪️ भारतीय रेल्वेचा वाढला 'वेग': रेल्वे क्षेत्रासाठी 2.40 लाख कोटींची तरतूद, नवीन योजनांसाठी 75 हजार कोटींची घोषणा
▪️ हा अर्थसंकल्प अपेक्षापूर्ती करणारा- PM मोदी: म्हणाले- गरीब, शेतकरी वर्गाला मिळेल फायदा, मध्यमवर्गीयांना करात मोठा दिलासा
▪️ हिंदुत्वासाठीच उठाव, बाकी अफवा: आमची सुरुवात शिवसेनेमुळे, बाळासाहेबांसह परिवाराबद्दल कायमच नितांत आदर - संजय राठोड
▪️ ‘कोल्हाट्याचं पोर’ लिहिणाऱ्या लेखकाच्या आईचा वनवास संपणार! शांताबाई काळेंना बच्चू कडूंची ‘प्रहार’ घर बांधून देणार
▪️ T20 मध्ये भारताचा सर्वात मोठा विजय: न्यूझीलंडला 168 धावांनी हरवत मालिका 2-1ने जिंकली, गिलचे शतक, पांड्याने टिपले 4 बळी
▪️ फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात होणार WPL खेळाडूंचा लिलाव: लिलाव मुंबई किंवा दिल्लीत होणार, तारीख आणि स्थळ BCCI ठरवेल
▪️ बॉक्स ऑफिसवर 'पठाण'ची यशस्वी घौडदौड सुरूच: सात दिवसांमध्ये कमावले 'इतके' कोटी, 400 कोटींकडे वाटचाल सुरू



