ऐनपूर ( सुवर्ण दिप वृत्तसेवा) : ऐनपूर येथील सरदार वल्लभाई पटेल कला व विज्ञान महाविद्यालय येथे ज्ञान गंगोत्री हस्तलिखित मंडळामार्फत हस्तलिखित प्रकाशित करण्यात आले. [ads id="ads1"]
महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता बरोबर त्यांच्यातील सुप्त कलागुणांचा विकास व्हावा व त्यांच्यामध्ये वांग्डमय साहित्याची अभिरुची निर्माण व्हावी या हेतूने महाविद्यालयात ज्ञान गंगोत्री हस्तलिखित भिंती पत्रकाचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य माननीय डॉ. जे. बी. अंजने यांच्या हस्ते 1 फेब्रुवारी 2023 ला करण्यात आले. यात विद्यार्थ्यांनी स्वलिखित मराठी, हिंदी व इंग्रजी साहित्य आणि विविध विषय घेऊन लेख, कविता, देशभक्तीपर गाणी , घोषवाक्य, सुविचार, वाक्प्रचार, लोकोक्ती(म्हणी), निबंध, चुटकुले इ. साहित्य आपापल्या हस्तक्षरात लिहून आणले. [ads id="ads2"]
ते साहित्य तपासून योग्य मार्गदर्शन करून त्यात सुधारणा करून ते साहित्याचे प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. रेखा पी पाटील, प्रा. नरेंद्र मुळे, प्रा. एम. के. सोनवणे, डॉ पी आर गवळी , ग्रंथपाल डॉ. संदीप साळुंखे व विद्यार्थी, विद्यार्थिनींचे सहकार्य लाभले.



