आज दिनांक 3 फेब्रुवारी च्या दिवसभरातील ठळक बातम्या

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

🎯 महाराष्ट्र सह संपूर्ण भारतातील घडामोडी वाचा 2 मिनिटात

▪️ नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत सत्यजित तांबेंनी मारली बाजी, ट्विट करत विजोयोत्सव साजरा न करण्याचे केले आवाहन


▪️ RSS च्या बालेकिल्ल्यात भाजपला धक्का: नागपूर शिक्षक मतदार संघात महाविकास आघाडीचे सुधाकर अडबाले विजयी


▪️ कोकणची सीट भाजपच्या खात्यात: शिक्षकांच्या पेन्शनचा प्रश्न सोडवणार; विजयी उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रेंची पहिली प्रतिक्रिया

 [ads id="ads1"]  

▪️ CM शिंदेंनी घेतली​ लोकशाहीवरील भाषण करणाऱ्या कार्तिकची भेट: प्रजासत्ताकदिनी व्हिडीओ झाला होता व्हायरल


▪️ महाराष्ट्र 21 पदकांसह अव्वल स्थानी: 'खेलो इंडीया'त 8 सुवर्ण, योगपटूंनी कामगिरीच्या जोरावर महाराष्ट्राची मान ताठ राखली - गिरीश महाजन


▪️ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गौप्यस्फोट: गुवाहाटी बंडावेळी गुरुदेव श्री. श्री. रवीशंकर यांनी फोनवरून आशीर्वाद दिला


▪️ अदानी घोटाळ्यात भाजपचा थेट संबंध: संजय राऊत यांचा गंभीर आरोप, म्हणाले- देशात 50 वर्षांत असा स्कॅम झाला नाही


▪️ युवक काँग्रेसचे नेते मानस पगार यांचे निधन: मतमोजणीसाठी नाशिकमध्ये येत असतानाच अपघात, सत्यजित तांबेंचे जवळचे सहकारी


▪️ समान नागरी संहिता लागू करण्याबाबत निर्णय नाही: कायदा मंत्री राज्यसभेत म्हणाले- यावर उपस्थित प्रश्नांची चौकशी अद्याप पूर्ण झालेली नाही

 [ads id="ads2"]  

▪️ RBIने बँकांना विचारले - अदानी ग्रुपला किती कर्ज दिले: संसदेत गदारोळ; विरोधकांची मागणी- संसद वा सुप्रीम कोर्टाच्या समितीने चौकशी करावी


▪️ 6 कोटी वर्ष जुन्या 2 शालिग्राम शिळा अयोध्येत पोहोचल्या: नेपाळपासून 373 किमी आणि 7 दिवसांचा प्रवास, प्रभू श्रीरामाची मूर्ती साकारणार


▪️ शाहिन आफ्रिदी होणार शाहिद आफ्रिदीचा जावई: 2 वर्षांपूर्वी जुळले होते संबंध, आज कराचीत अंशा आफ्रिदीशी निकाह


▪️ पुन्हा एकदा एकत्र दिसणार 'पठाण' आणि 'टायगर': आम्ही सलमान-शाहरुखला पुन्हा एकत्र आणण्याचा प्रयत्न करू, लेखक श्रीधर राघवन यांचे संकेत


▪️ 30 किलोची साडी, तीन कोटींचे दागिने: 'शाकुंतलम'साठी सामंथाचे महागडे कपडे, कालिदासच्या नाटकावर आधारित आहे चित्रपट


👍 *अमरावती पदवीधरमध्ये धीरज लिंगाडेंचा विजय* :


अमरावती पदवीधर मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार धीरज लिंगाडे पाटील यांचा विजय झाला आहे. अत्यंत चुरशीच्या झालेल्या लढतीत लिंगाडे यांनी भाजपचे उमेदवार डॉ. रणजित पाटील यांचा पराभव केला आहे. रणजित देशमुख यांचा पराभव हा भाजपसाठी मोठा धक्का मानला जात आहे.    


😇 *प्रश्नपत्रिका मोबाईलवर फॉरवर्ड कराल तर परीक्षेला मुकाल* :


यंदा दहावी बारावीच्या परीक्षेचे नियम कडक करण्यात आले आहेत. परीक्षेच्या प्रश्नपत्रिकांची चोरी करणे, प्रश्नपत्रिका मिळविणे, विकणे आणि विकत घेतल्यास किंवा मोबाईल अन्य इलेक्ट्रॉनिक्स माध्यमावर प्रसारित केल्यास परीक्षार्थी विद्यार्थ्याची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच विद्यार्थ्यास पुढील पाच परीक्षांना प्रतिबंध करण्यात येणार आहे. शिवाय परीक्षार्थ्याविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. 


🗣️ *अजित पवार यांचा सत्यजीत तांबे यांना सल्ला* :


नाशिक पदवीधर मतदारासंघाच्या निवडणुकीत सत्यजीत तांबे निवडून आल्यानंतर काँग्रेस आणि भाजपही त्यांना बोलवण्याचा प्रयत्न करणार पण त्यांना स्वत:चं राजकीय भवितव्य आहे हे त्यांनी पाहावं, असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दिला आहे. ते पुण्यात बोलत होते. 


🔎 *सत्यजित तांबेंना पुन्हा काँग्रेसमध्ये घेणार?* :


“नाशिकमध्ये आमच्यासोबत डॉ. सुधीर तांबे यांनी विश्वासघात केला. या मतावर मी आजही ठाम आहे. सत्यजित तांबे यांनी उमेदवारी द्यावी, असे त्यांनी आम्हाला सांगितले असते, तर आम्ही सत्यजित यांना उमेदवारी दिली असती. आमचा तेथे विश्वासघात झालेला आहे. येथे भाजपाने खेळी केलेली आहे. बंडखोर उमेदवार सत्यजित तांबे निवडून येणार असे भाजपाचे अनेक नेते, मंत्री म्हणत होते. हे भाजपाने नियोजनबद्धपणे केले होते, हे कोणालाही नाकारता येणार नाही. त्यांना पक्षात घ्यायचे की नाही, याचा निर्णय हायकमांडच घेईल,” असे नाना पटोले यांनी सांगितले.


😎 *भाजपचे उमेदवार आज रात्री घोषित होणार* :


कसबा, चिंचवड पोटनिवडणुकीच्या उमेवारांची नावे आज संध्याकाळपर्यंत, रात्री उशिरा दिल्लीतून घोषित होतील, अशी माहिती मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली. महायुतीमधल्या घटक पक्षांचा या निवडणुकीबाबत मेळावा झाला. या मेळाव्याला सर्व पक्षाचे प्रतिनिधी उपस्थित होते.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!