रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा) मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर असीरगड येथे सिहौर येथील शिवमहापुराण कथाकार पंडित प्रदीप मिश्रा महाराज यांची ३ ते ९ फेब्रुवारीदरम्यान दररोज दुपारी दोन ते चार वाजेदरम्यान शिवपुराण महाकथा होणार आहे. रावेर तालुक्यातील शिवभक्तांसाठी दररोज ४८ बस रावेर आगारातून सुटणार आहेत. त्याच बस भाविकांना घेऊन परतणार असल्याची माहिती रावेर आगार व्यवस्थापक नीलेश बेंडकुळे यांनी दिली.[ads id="ads2"]
महाराष्ट्रातून लाखो शिवभक्त या शिवमहापुराण कथेसाठी दाखल होणार असल्याचा अंदाज आहे. त्या अनुषंगाने जिल्हाभरातील तथा बाहेर जिल्ह्यातूनही बस दाखल होणार असल्याची माहिती रावेर आगार व्यवस्थापक बेंडकुळे यांनी दिली. शुक्रवारपासून सुरू होणाऱ्या या शिवपुराण कथेसाठी रावेर आगाराची तयारी पूर्ण झाल्याचेही त्यांनी बोलतांना सांगितले.
शिवपुराण महाकथेसाठी रावेरहून ४८ विशेष बसफेऱ्या:रावेर आगार व्यवस्थापक नीलेश बेंडकुळे यांची माहिती
व्हिडिओ


%20-%202023-02-03T090403.085.jpeg)