"आनंदाचा शिधा " आठ लाख लाभार्थ्यांना, गुढीपाडवा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त वितरण राज्य शासनाची घोषणा

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे


नांदगाव  प्रतिनिधी (मुक्ताराम बागुल) -  गुढीपाडवा आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्ताने शिधापत्रिका धारकांना शंभर रुपयांमध्ये आनंदाचे शिधा देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य शासनाने घेतला असून नाशिक जिल्ह्यातील ७ लाख 93 हजार ५११ अंत्योदय व प्राधान्य शिधापत्रिकाधारक कुटुंबीयांना त्याचा फायदा होणार आहे.[ads id="ads1"]  

         महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाच्या दिनांक 22 फेब्रुवारी 2013 रोजी बुधवारी झालेल्या बैठकीमध्ये शंभर रुपयांमध्ये प्रत्येकी एक किलो रवा, चना डाळ, साखर व एक लिटर पामतेल कशा वस्तू असलेल्या आनंदाचा शिधा शंभर रुपयात उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला. यापूर्वी दिवाळीतही महाराष्ट्र शासनाने अशाच पद्धतीने शिधापत्रिका धारकांना शिधावितरित केला होता. [ads id="ads2"]  

  परंतु दिवाळीचा अनुभव पाठीशी असल्याने शासनाने ई पोसची व्यवस्था नसलेल्या ठिकाणी ऑनलाइन पद्धतीने आनंदाचे सुद्धा वितरणाचे निर्देश दिले आहेत. शासनाच्या निर्णयामुळे राज्यातील एक कोटी 63 लाख शिधापत्रिकांची संख्या ७ लाख ९३ हजार ५१९ इतकी आहे. त्यामध्ये १ लाख ७८ हजार ५११ प्राधान्य रेशन कार्ड आहेत. या सर्व रेशनकार्डधारक लाभार्थी कुटुंबांना या निर्णयामुळे शंभर रुपयांमध्ये चार वस्तू असलेला शिधा उपलब्ध होईल.

        पंधरवड्यात निविदा

आनंदाचा शिधासाठी आवश्यक वस्तूंच्या खरेदी करिता महा टेंडर्स ऑनलाइन पोर्टलद्वारे २१ दिवसा ऐवजी १५ दिवसांच्या कालावधीत विविध प्रक्रिया राबविण्यात येईल. 2022 मध्ये दिवाळी निमित्ताने शिधावस्तू खरेदीसाठी विविध प्रक्रियेत 279 प्रति संच या दरानुसार 455 कोटी 94 लाख आणि इतर अनुषंगिक खर्चासाठी 97 कोटी 64 लाख अशा 473 कोटी 58 लाख इतक्या खर्चास कॅबिनेटमध्ये मान्यता देण्यात आली.

         शासनाच्या निर्णयाचे स्वागत करतो. दिवाळीमध्ये शिधा वितरणाचे वेळी सहा रुपये कमिशन रेशन दुकानदारांना देण्यात आली. त्यामध्ये यांचा वाढदिवस करून मिळावी, रेशन दुकानांमध्ये वेळेचे संच पोहोचतील अशा पद्धतीने नियोजन करावे, जेणेकरून दुकानदार व लाभार्थी यांच्यात वादाचे प्रकार उद्भवणार नाहीत.

सुनंदा बागुल,नांदगाव महिला तालुकाध्यक्ष

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!