महाराष्ट्र,गुजरात,मध्यप्रदेश राज्याला जोडणाऱ्या महामार्गावरील लक्षवेधी प्रवेशद्वार
यावल (सुरेश पाटील) तालुक्यातील किनगाव ग्रामस्थांनी आपल्या गावचे मुख्य प्रवेशद्वाराचे नामकरण करण्याकरीता किनगाव बुद्रुक ग्रामपंचायतीची विशेष ग्रामसभा मोठ्या उत्साहात व शांततेत पार पाडली यात ग्रामसभेसमोर प्रवेशव्दार च्या नामकरण करीता ३ नावे सुचवण्यात आली होती यातील आई तुळजा भवानी माता प्रवेशव्दार या नावावर बहुमातांनी शिक्कामार्तब करण्यात आला.गेल्या काही वर्षांपासुन नामकरणचा रेंगाळलेला हा मुद्दा महिला सरपंच यांनी सोडवल्याने किनगाव ग्रामस्थांसह परिसरात किनगाव ग्रामपंचायतचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत आहे.यात किन गावातील तरुणांची जनजागृती आणि समयसूचकतेची महत्त्वाची भूमिका ठरली.[ads id="ads1"]
महाराष्ट्र,गुजरात,मध्यप्रदेश राज्याला जोडणाऱ्या महामार्गावरील लक्षवेधी असलेले प्रवेशद्वार किनगाव ता.यावल येथे म्हणजे बऱ्हाणपूर अंकलेश्वर महामार्गावर आहे, किनगाव ग्रामपंचायत गावाचे मुख्य प्रवेशव्दार माजी आ.रमेश विठ्ठल चौधरी यांच्या प्रयत्नातुन झालेले होते मात्र या प्रवेशद्वारावर नामकरण झाले नव्हते तर या मुख्य प्रवेशद्वाराला नामकरण करण्यात यावे या संदर्भात सरपंच निर्मला संजय पाटील यांच्याकडे अर्ज प्राप्त झाला होता व त्यांनी या अर्जाच्या अनुशंगाने गुरूवार दि.23 रोजी जाहीर विशेष ग्रामसभा बोलावली होती या सभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच निर्मला संजय पाटील या होत्या तर माजी आमदार रमेश चौधरी,निवासी नायब तहसिलदार संतोष विनंते,माजी जिल्हा परिषद सदस्य रत्ना चौधरी,पंचायत समितीचे माजी उपसभापती उमाकांत पाटील,उपसरपंच लुकमान तडवी,संजय पाटील,विस्तार अधिकारी किशोर सपकाळे,पोलिस पाटील रेखा नायदे इ.सह सर्व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांची उपस्थिती होती या ग्रामसभेत मुख्य प्रवेशव्दाराला नाव देण्यासाठी एकूण तीन अर्ज प्राप्त झाले होते यातील आई तुळजा भवानी माता प्रवेशव्दार या नावावर सर्वानुमते शिक्कामोर्तब करण्यात आला.या ग्रामसभेचे सुत्रसंचालनल ग्रामविकास अधिकारी प्रदिप धनगर यांनी केले.[ads id="ads2"]
ग्रामसभेत मुख्य प्रवेशव्दारावर नामकरण करण्यासाठी अर्ज मांगण्यात आले होते यात आई तुळजा भवानी माता प्रवेशव्दार,संविधान प्रवेशव्दार, शाहु फुले,आंबेडकर प्रवेशव्दार हे तीन नावं अर्जाव्दारे सुचवण्यात आले होते.या प्रवेशव्दाराचे नामकरण करतांना संपुर्ण गावकऱ्यांचे मतं जाणून घेत निर्णय व्हावा या उद्देशाने आपण ग्रामसभा बोलावली होती व ग्रामसभेतुन निर्णय व्हावा म्हणुन या पुर्वीचं सदस्यांची सभा घेवुन त्यांना देखील विश्वासात घेतले व सर्वानुमते निर्णय घेणे शक्य झाले,असे सरपंच निर्मलाताई यांनी सांगीतले.या विशेष ग्रामसभेसाठी तरूणांनसह महिला व ग्रामस्थांचे मोठे सहकार्य लाभून ग्रामपंचायतसह गावाच्या विकासासाठी,जनजागृती आणि समय सूचकता महत्त्वाची ठरली असल्याचे किनगाव परिसरात बोलले जात आहे.


