ऐनपुर महाविद्यालयातील कुमारी श्रद्धा संतोष बारी ची विद्यापीठ संघात निवड

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 


ऐनपूर (विनोद कोळी) - येथील ऐनपूर परीसर शिक्षण प्रसारक मंडळ संचलित सरदार वल्लभभाई पटेल कला व विज्ञान महाविद्यालयातील कुमारी श्रद्धा संतोष बारी, एम. एस. स्सी. प्रथम वर्षाची विद्यार्थिनी मिनी गोल्फ या खेळात कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या संघात निवड करण्यात आली आहे. [ads id="ads1"]  

सदर अंतर विद्यापीठ मिनी गोल्फ महिला स्पर्धा सुरेश ज्ञान विहार विद्यापीठ जयपूर राजस्थान येथे दिनांक 01/03/2023 ते 05/03/2023 या दरम्यान होणार आहेत. अंतर विद्यापीठ मिनी गोल्फ संघात निवड झाल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष श्री. भागवत विश्वनाथ पाटील, सर्व संचालक मंडळ, प्राचार्य डॉ. जे. बी. अंजने, महाविद्यालयाचे क्रीडा संचालक डॉ. सचिन झोपे प्राध्यापक नरेंद्र मुळे प्राध्यापक एस. पी. उमरीवाड यांनी फुलगुच्छ देऊन स्वागत केले. [ads id="ads2"]  

  कुमारी सुद्धा संतोष बारी हिची विद्यापीठ संघात निवड झाल्याबद्दल स्थानिक क्रीडा समितीचे सदस्य डॉ. के.जी. कोल्हे, डॉ. पी. आर. गवळी डॉ.आर.व्ही. भोळे, डॉ. एस. आर. इंगळे डॉ. सौ. रेखा पाटील श्री गोपाल महाजन संघात निवड झाल्याबद्दल अभिनंदन केले. कुमारी श्रद्धा संतोष भारी हिला डॉ. सचिन झोपे प्राचार्य डॉ. जे . बी. अंजने यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभत आहे व पुढील होणाऱ्या अंतर विद्यापीठ स्पर्धेसाठी प्राध्यापक वर्ग व शिक्षकेतर कर्मचारी यांनी शुभेच्छा दिल्या.

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!