यावल प्रतिनिधी (फिरोज तडवी)
यावल तालुक्यातील किनगाव येथील प्रजापिता ब्रह्माकुमारी सेवाकेंद्राने शिवरात्री सप्ताह महोत्सव निमित्त जेष्ठ नागरिकांना सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमासाठी माजी आमदार श्री. रमेश विठ्ठल चौधरी, श्री. सुरेशदादा चौधरी, डोनगाव इंग्लिश मीडियम स्कूल चे संस्थापक,अध्यक्ष विजयनाना पाटील लाभले होते.[ads id="ads1"]
या कार्यक्रमातील प्रमुख वक्ते श्री. शशिकांत वारुळकर यांनी 'जेष्ठ नागरिकांच्या समस्या आणि त्यांचे अध्यात्मिक समाधान' या विषयावर आपले विचार मांडले. त्यांनी जेष्ठांना स्वतः ला व्यस्त ठेवण्याचे आवाहन केले त्यासाठी अध्यात्म हा एक उत्तम मार्ग असल्याचे स्पष्ट उल्लेख केला. अध्यात्मामुळे आपले आत्मबळ वाढून आपल्याला नवचैतन्य आणि ऊर्जा प्राप्त होते. तसेच आपण हीन भावनेपासून ही दूर राहतो.[ads id="ads2"]
अध्यात्म आपल्याला मनःशांती देण्याचे कार्य करते असे प्रतिपादन केले. या कार्यक्रमात बी. के. राजश्री दिदींनी उपस्थितांना राजयोग मेडिटेशन चा अभ्यास करवून आपली जीवन शैली आदर्श बनवण्यासाठी ब्रह्माकुमारीच्या राजयोग मेडिटेशन चा वापर करण्याचे आवाहनही करण्यात आले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन छाया ताई बियाणी यांनी केले तर उपस्थितांचे आभार रेखा माता यांनी मानले.
ह्या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. अरुण बियाणी, शांताराम पाटील, प्रल्हाद भाई, दिनकर भाई, आशामाता, छाया शिंपी, छाया पाटील, सविता माता, शोभा माता, मीरा माता, कमल माता आदींचे सहकार्य लाभले.