यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
यावल ( फिरोज तडवी )
यावल तालुक्यातील अंजाळे गावातील कोतवाल याला वाळु माफीया कड्डन चक्क कार्यालयात घुसून कोतवालास बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना घडली असुन , या घटनेमुळे महसुल प्रशासनात संत्पत प्रतिक्रीया व्यक्त करण्यात येत आहे. [ads id="ads1"]
या संदर्भात मिळालेली माहीती अशी की , अंजाळे तालुका यावल येथे कोतवाल म्हणुन कार्यरत असलेले ओकार लिलाधर सपकाळे हे दिनांक २५ फेबुवारी रोजी दुपारी २ ,३० वाजेच्या सुमारास अंजाळे येथील तलाठी कार्यालयात शासकीय कामकाज करीत असतांना ९ते १० वाळु माफीया यांनी कार्यालयात घुसून अंजाळे येथील ओंकार सपकाळे यांना आमच्या विरुद्ध तक्रार का दिली असे जाब विचारत त्यांना लाकडी दांड्यानी बेदम मारहाण करीत शासकीय कामकाजात अडथळा निर्माण केला. [ads id="ads2"]
याबाबत यावल तालुका तलाठी व कोतवाल संघटनेच्या वतीने प्रशांत सरोदे , व्ही एस आढाळे , पि एम तावडे , विजय साळवे , निनेश आर गायक्वाड , व्ही एल सोळंके यांच्या स्वाक्षरीचे निवेदन पोलीस निरिक्षक राकेश मानगावकर यांना देण्यात आले असुन , मुजोर झालेल्या वाळु माफिया विरूद्ध तात्काळ कार्यवाही व्हावी अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आली असुन , या संदर्भात रात्री उशीरा पर्यंत यावल पोतीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहीती पोतीस यावल पोलिसांकडून सांगण्यात देण्यात आली.