रावेर तालुका प्रतिनिधि - विनोद हरी कोळी
ऐनपूर- येथील ऐनपूर परिसर शिक्षण प्रसारक मंडळाच्या सरदार वल्लभभाई पटेल कला व विज्ञान महाविद्यालयातील अंतर्गत गुणवत्ता हमी समिती आणि रसायनशास्त्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान प्रा. डॉ. के. जी. कोल्हे यांनी भूषविले. [ads id="ads1"]
कार्यक्रमाच्या सुरवातीला रसायनशास्त्र मंडळाचे समन्वयक डॉ. जयंत नेहेते यांनी प्रास्ताविक सादर केले. त्यात त्यांनी रसायनशास्त्र मंडळाचे कार्य, उद्दिष्टे सांगितली. तसेच रसायनशास्त्र मंडळ विद्यार्थ्यांमध्ये रसायनशास्त्र विषयाबद्दल आवड निर्माण करून त्यांच्या मध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन वृद्धिंगत होण्यासाठी कार्यरत आहे असे सांगितले. सदर कार्यक्रम प्रसंगी व्यासपीठावर प्रा. डॉ. के. जी. कोल्हे, डॉ. एस. ए. पाटील, डॉ. सतीश वैष्णव, डॉ. डी. बी. पाटील, प्रा. संकेत चौधरी, प्रा. केतन बारी आणि डॉ. जयंत नेहेते उपस्थित होते. [ads id="ads2"]
डॉ. डी. बी. पाटील हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते. त्यांनी आपल्या मार्गदर्शनपार व्याख्यानात सर सी.व्ही रमन यांच्या संशोधन कार्याविषयी माहिती सांगितली, विज्ञानातील विविध शोधांचा उपयोग सकारात्मक रीतीने केल्यास राष्ट्र विकासात त्याची भर पडेल असे मत मांडले. अध्यक्षीय समारोपात प्रा. डॉ. के. जी. कोल्हे यांनी सर सी.व्ही रमन यांच्या संशोधनामुळे विज्ञानाच्या क्षेत्रात जगामध्ये भारताचे वेगळे स्थान निर्माण झाले. उपलब्ध परिस्थितीचा यथायोग्य वापर केल्यास उत्तम संशोधन कार्य होऊ शकते असे मत मांडले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. जयंत नेहेते तर आभार प्रदर्शन डॉ. सतीश वैष्णव यांनी केले. सदर कार्यक्रमानंतर रसायनशास्त्र मंडळातर्फे सामान्य विज्ञान या विषयावर परीक्षेचे आयोजन करण्यात आले. सदर कार्यक्रमास ६८ तर परीक्षेस एकूण ६१ विद्यार्थी हजार होते. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्राचार्य डॉ. जे. बी. अंजने यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.