यावल तालुक्यातील शेतकरी बांधवांसाठी कोरपावली विकास मधेही भरड धान्य खरेदीसाठी नोंदणी करण्याचे चेअरमन राजेश फेगडे यांचे आवाहन

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे


यावल (फिरोज तडवी)

 २०२२-२०२३ वर्षाच्या रब्बी हंगामात केंद्र शासना कडुन शेतकऱ्यांना हमीभाव मिळावा या उद्देशाने शासनाच्या आदेशानुसार किमान आधारभूत किंमत खरेदी योजने अंतर्गत नाफेड चे हरभरा खरेदी केंद्र यावल ,उपअभिकर्ता संस्था म्हणून तालुक्यातील कोरपावली विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीमार्फत हरभरा खरेदीसाठी नावनोंदणी जिल्हा पणन अधिकारी यांचे आदेशानुसार १ मार्च २०२३ पासून सुरू होणार आहे. [ads id="ads1"]  

 तरी परिसरातील शेतकरी बंधूंनी  नाव नोंदणी साठी आवश्यतेप्रमाणे लागणाऱ्या कागद प्त्रकांची पूर्तता कारणे गरजेचे असल्याने नोंदणी साठी आधार कार्ड झेरॉक्स, बॅक पासबुक झेरॉक्स, हरभरा पिकाचा ऑनलाईन चालु रब्बी हंगामाचा पिक पेरा नोंदविलेला ७/१२ उतारा घेऊन कोरपवली येथील विकास सोसायटी या संस्थेशी संपर्क करावा. [ads id="ads2"]  

  शेतकरी बांधवांसाठी या योजनेतून पारदर्शक कारभारासाठी शेतमालाची रक्कम आपण दिलेल्या बँक खाती ऑनलाइन पद्धतीने जमा होणार आहे, त्यामुळे बँक खात्याची माहिती बिनचूक देण्यात यावी ; अन्यथा आपली रक्कम जमा होण्यास विलंब होईल किंवा चुकीच्या बँक खात्यामध्ये रक्कम वर्ग होऊ शकते . 

हमीभाव ५३३५ ₹

उत्पादकता :- १३५० किलो हेक्टरी

:-राकेश वसंत फेगडे (चेअरमन वि.का.सोसायटी.कोरपावली ) व सेक्रेटरी मुकुंद तायडे यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!