यावल भुसावळच्या मार्गावरील अंजाळे घाटाजवळ रात्री घडलेल्या रस्तालुटीतील पोलीसांना दोन आरोपी शोधण्यात यश

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 


यावल प्रतिनिधी (फिरोज तडवी)

 यावल भुसावळ रस्त्यावर अजय मोरे हे नेहमी प्रमाणे आपली कामे आटपून भुसावळ कडून यावल कडे आपल्याकडील शाईन कंपनीच्या मोटरसायकलने यावल कडे येत असतांना अंजाळे घाटावर २४ ते २५ वर्षे वयोगटातील चार अज्ञात चोरट्यांनी मोरे यांची मोटरसायकल रोखत त्यांना पिस्तोलचा धाक दाखवून त्यांचे कडील मोटर सायकल सह मोबाईल घेऊन पसार झाले होते मत्र पोलिस चक्र अधिकच जलद गतीने फिरवून यातील दोन संशयीत आरोपींना शोधण्यात पोलिसांना यश आले आहे.सदरची घटना रात्री पावणेदहा वाजे ची सुमारास घडली आहे.[ads id="ads1"]  

अधिकवृत्त असेकी सादर घटनेची माहिती यावल पोलीस ठाण्यात कळताच पोलीस निरिक्षक राकेश मानगावकर यांच्या आदेशावरून पोलीस उपनिरिक्षक अविनाश दहिफळे, सहाय्यक फौजदार मुजफ्फर पठान व त्यांचे पोलीस पथक घटनास्थळाकडे रवाना झाली आहे एस१९४२ शाईन कंपनीची गाडी तसेच जवळील मोबाईल घेऊन पळून गेल्याची घटना घडली होती, या गुन्ह्याच्या तपासकामी पोलीस निरिक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरिक्षक अविनाश दहिफळे , सहाय्यक फौजदार मुजफ्फर खान पठान व पोलीस पथकांनी आरोपींच्या शोध कार्यासाठी वेगाने तत्परता दाखवुन काही तासातच या रस्ता लुटीच्या गुन्ह्यातील संशयीत आरोपी म्हणुन करण रमेश पवार व विक्की अंकुश साळवे दोघ राहणार आसोदा तालुका जिल्हा जळगाव यांना यावल शिवारातुन शिताफीने अटक करण्यात यश मिळाले असुन , तर दोन आरोपींचा शोध अद्याप लागतोला नाही. [ads id="ads2"]  

  चोरटे त्यांचे कडील बुलेट व एक्टिवा गाडीने आले होते . यावल भुसावळ हा मार्ग वाहतुकीचा असुन रात्रीच्या वेळेस देखील मोठया प्रमाणावर येणाऱ्या जाणाऱ्या प्रवासी नागरीकांची नेहमीच वर्दळ या मार्गावर असते, या ठीकाणी अंजाळे घाटावर मागील अनेक वर्षापासुन या ठिकाणी पोलीस चौकी बांधण्यात आली असून मात्र नागरीकांच्या रक्षणासाठी या चौकीवर पोलीस राहात नसल्याने अशा प्रकारच्या रस्तालुटीच्या घटना घडत असतात , तरी पोलीस प्रशासनाने या पोलीस चौकीवर रात्रीच्या वेळी पोलीस बंदोबस्त ठेवावा अशी मागणी नागरीक करीत आहे .

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!