रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा) ऐनपूर परिसर शिक्षण प्रसारक मंडळाच्या सरदार वल्लभभाई पटेल कला व विज्ञान महाविद्यालयातील स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रा तर्फे विद्यार्थ्यासाठी “पदवी नंतर उच्च शिक्षणातील विविध वाटा “ या विषयावर व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले. सदर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जे. बी. अंजने यांनी भूषविले. कार्यक्रमाच्या सुरवातीला लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेलांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.[ads id="ads1"]
व्यासपीठावर श्री निलेश बनसोडे, श्री. विशाल बारी, प्राचार्य डॉ. जे. बी. अंजने, डॉ. सतीश वैष्णव उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्तविक डॉ. सतीश एन. वैष्णव यांनी केले. प्रमुख मार्गदर्शक श्री निलेश बनसोडे, संदीप युनिव्हर्सिटी नाशिक यांनी आपल्या मार्गदर्शनात पदवी नंतर उच्च शिक्षणातील विविध पर्याय याबद्दल माहिती दिली. त्यानंतर विद्यार्थ्यांना पदुत्तर शिक्षणासाठी घेतल्या जाणाऱ्या विविध प्रवेश परीक्षा व त्यांचे स्वरूप समजावून सांगितले.[ads id="ads2"]
विद्यार्थ्याशी हितगूज करतांना संदीप युनिव्हर्सिटी नाशिक येथे पदव्युत्तर शिक्षणासाठी उपलब्ध असलेल्या विषयांबद्दल माहिती दिली, त्यांच्या विविध शंकाचे निरसन केले. अध्यक्षीय समारोपात प्राचार्य डॉ. जे. बी. अंजने यांनी परम्परागत पदव्युत्तर शिक्षणाऐवजी आजच्या स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांनी उपयोगात्मक विषयांमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेणे जास्त योग्य आहे असे सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सतीश एन. वैष्णव यांनी तर आभार प्रा मिलिंद भोपे यांनी मानले. सदर कार्यक्रमाला एकूण ५२ विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीते साठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जे. बी. अंजने यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. जयंत नेहेते, प्रा. एच एम. बाविस्कर, कु. सुषमा मोतेकर, कु. यास्मिन पटेल आणि सर्व प्राध्यापक व प्राध्यापकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.


