माता रमाई आंबेडकर यांच्या जयंती उत्सव निमित्त सावद्यात भिमगीतांचे आयोजन

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे


सावदा प्रतिनिधी (युसूफ शाह)

रावेर तालुक्यात असलेल्या सावदा येथे अनुसूचित जाती महिला संघर्ष समिती व भिमाई महिला बचत गट यांचे संयुक्त विद्यमानाने शहरात कोचुर रोड याठिकाणी दि.२५ फेब्रुवारी २०२३ रोजी सायंकाळी ६-वाजता त्याग मूर्ती माता रमाई आंबेडकर यांच्या १२५ वी जयंती उत्सवानिमित्त"बहुजन क्रांतीचा बुलंद आवाज भीम विचारांची तोफ व भीम गीताचे गायक विकास राजा नागपूर" यांच्या भीम गीतांचा दणदणीत कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे.[ads id="ads1"]  

सदरील कार्यक्रमात अध्यक्ष स्थान विधान परिषदेचे आमदार एकनाथरावजी खडसे, कार्यक्रमाचे उद्घाटक मुक्ताईनगर विधानसभेचे आमदार चंद्रकांत पाटील,दीप प्रज्वलन खासदार रक्षाताई खडसे व इतर मान्यवरांच्या विशेष उपस्थिती राहील.[ads id="ads2"]  

  तरी या कार्यक्रमात मोठ्या संख्येने नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन कार्यक्रमाचे आयोजक माजी उपनगराध्यक्ष सौ नंदाताई मिलिंद लोखंडे व माजी नगरसेविका सुभद्राबाई सिद्धार्थ बडगे,प्रदेश सचिव अ.जा.काँग्रेस प्रतिभा मोरे,सामाजिक कार्यकर्ता सौ.लक्ष्मीताई मेढे,समाजसेवक गजु सर लोखंडे व मित्रपरिवार यांनी केले आहे.

हेही वाचा :- सावद्यात दोन गटात हाणामारीत पोलीसांना मारहाण प्रकरणी गुन्हा दाखल! 

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!