ऐनपूर येथील सरदार वल्लभभाई पटेल कला व विज्ञान महाविद्यालय येथे मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी अध्यक्षस्थानी प्रा. डॉ. रेखा प्रमोद पाटील या होत्या. त्यांनी आपल्या भाषणातून भाषेवर प्रभुत्व मिळवावयाचे असेल तर शब्द संपत्ती वाढवा असे सांगितले.[ads id="ads1"]
प्रमुख वक्ते म्हणून प्रा. एम. के. सोनवणे यांनी कवी कुसुमाग्रज यांची साहित्य विषयक कामगिरी विषद केली. वि. वा. शिरवाडकर या नावाने त्यांनी नाटक लेखन केलेले आहे. 'नटसम्राट' हे सुप्रसिद्ध नाटक शिरवाडकर यांनी लिहिलेले आहे. त्याचप्रमाणे 'कुसुमाग्रज' या टोपण नावाने त्यांनी काव्य लेखन केलेले आहे. 'पृथ्वीचे प्रेमगीत', 'गर्जा जयजयकार, क्रांतीचा गर्जा जयजयकार' या त्यांच्या कविता सुप्रसिद्ध आहेत.[ads id="ads2"]
कार्यक्रमाला प्रा. डॉ. व्ही. एन. रामटेके , प्रा. प्रदीप तायडे , शिक्षकेतर कर्मचारी आणि मराठी विभागातील सर्व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अल्ताफ पटेल याने केले तर ललित कडू पाटील याने उपस्थितांचे आभार मानले. सदर कार्यक्रम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जे. बी. अंजने यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला.


