ऐनपुर ता.रावेर (दिनेश सैमिरे) आज दि.19/2/2023.रोजी. ऐनपुर तालुका रावेर येथील ग्रामपंचायत मध्ये शिवजयंती साजरी करण्यात आली सर्वप्रथम ऐनपुर येथील सरपंच अमोल महाजन व ग्रामसेवक श्री गोसावी भाऊसाहेब यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून पूजन केले.[ads id="ads1"]
यानंतर प्रहार दिव्यांग क्रांती संघटना रावेर तालुका उपाध्यक्ष जितू कोळी यांनी सुद्धा पुष्पहार घालून पूजा केली यानंतर थोडक्यात मनोगत व्यक्त करण्यात आले संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य देवत छत्रपती शिवाजी महाराज यांची विचार सरणी लक्षात घेता सर्वांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे गुण घेतले पाहिजे संपूर्ण महाराष्ट्रात असा एकच राजाला आपण सर्वांनी लाभला की यांनी स्वतः त्या जीवाची आहुती देऊन स्वराज्य स्थापन केले आहे अशा या महान राजाला ग्रामपंचायत ऐनपूर मध्ये शत शत नमन केले.[ads id="ads2"]
त्या ठिकाणी उपस्थित सरपंच अमोल महाजन व उपसरपंच राहुल पाटील व ग्रामसेवक श्री गोसावी भाऊसाहेब व ग्रामपंचायत सदस्य अनिल जैतकर पृथ्वीनाथ जैतकर पंकज पाटील राहुल महाजन पत्रकार विजय अवसरमल मोहन कचरे प्रहार दिव्यांग क्रांती संघटना रावेर तालुका उपाध्यक्ष जितू कोळी विश्वनाथ भिल बापू लोहार संजय मावळे योगेश महाजन इत्यादी उपस्थित होते.
हेही वाचा:- अखेर प्रतीक्षा संपली : PM Kisan सन्मान निधीचा १३ वा हप्ता तुमच्या खात्यात "या" तारखेला जमा होणार