ऐनपुर प्रतिनिधी:- विजय एस अवसरमल
सरदार वल्लभभाई पटेल कला व विज्ञान महाविद्यालय ऐनपूर येथील विद्यार्थी विकास विभागामार्फत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्ताने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.[ads id="ads1"]
या व्याख्यानाचे प्रमुख वक्ते प्रा. संदीप धापसे, श्री व्ही. एस. नाईक महाविद्यालय, रावेर यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्वराज्य,सुराज्य तसेच ते बहुजन प्रतिपालक राजे होते. त्यांच्या आरमारामध्ये सर्व जाती धर्माचे सैन्य होते. त्यांच्या राज्यामध्ये सर्व मानवांना सुरक्षित असे स्थान होते असे त्यांच्या व्याख्याना मध्ये सांगितले.या कार्यक्रमाचे अध्यक्ष व महविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जे.बी. अंजने यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांनी सर्व तळागाळातील प्रजेला सुखी समाधानांचे जीवन जगण्याकरिता प्रोत्साहित केले.[ads id="ads2"]
निजामशाही, आदिलशाही, कुतुबशाही, मुघल यांच्या पासून जनतेचे रक्षण केले.गनिमी कावा या युद्ध नीतीचा अवलंब करून हिंदवी स्वराज्याची स्थापना केली असे त्यांच्या अध्यक्षीय मार्गदर्शनामध्ये सांगितले.
हेही वाचा:- अखेर प्रतीक्षा संपली : PM Kisan सन्मान निधीचा १३ वा हप्ता तुमच्या खात्यात "या" तारखेला जमा होणार
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रमुख वक्त्याचा परिचय विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. डॉ. व्ही. एन. रामटेके यांनी केला. या कार्यक्रमाला ९४ प्राध्यापक, प्राध्यापकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाला उपस्थित मान्यवरांचे आभार प्रा. प्रदीप तायडे यांनी मानले.