शिक्षणाने माणूस शिक्षित होईल, संस्कारक्षम झाला पाहिजे --- शिवश्री लक्ष्मण पाटील

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे


धरणगाव (प्रतिनीधी) ग्राम सुधारणा मंडळ संचलित, साळवे इंग्रजी विद्यालय, साळवे. ता.धरणगाव येथे आज दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न झाला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून शिवव्याख्याते लक्ष्मण पाटील सर धरणगाव हे होते त्यांनी मार्गदर्शन केले, शिक्षणाने माणूस शिक्षित होईल पण संंस्कारक्षम होईलच असे नाही.देशात माणसंची गरज आहे, माणूस निर्माण झाला पाहिजे. शिवरायांना डोक्यावर घेतले, डोक्यात घ्या. छत्रपती शिवाजीराजे-अफजलखान भेट सत्ता संघर्ष होता,हिंदू-मुस्लिम द्वेष नव्हता. हि भूमी युध्दाची नाही, बुद्धांची आहे.शिवरायांच्या युनिककल्पना मेमरीत ठेवा. असे प्रतिपादन केले.[ads id="ads1"]  

 कार्यक्रमाचे अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते श्री सुनील चौधरी, धरणगाव हे होते. त्यांनी सांगितले की विहीरीचे पाणी कार्ल्याला दिले ते कडू उपजेल.मिरचीला दिले तर ती तिखट उपजेल व तेचपाणी ऊसाला दिले तर ऊस गोड उपजेल. त्याप्रमाणेच शिक्षक व शाळा सर्वच विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात. असे सांगितले. प्रमुख पाहुणे ग्रा.सु.मंडळाचे अध्यक्ष डॉ गिरीश नारखेडे, उपाध्यक्ष जी.एन.पाटील, खजिनदार श्री डॉ चंद्रकांत नारखेडे व सदस्य सुभाष बोरोले आदी उपस्थित होते. [ads id="ads2"]  

  त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन, शुभेच्छा आणि आशीर्वाद दिले. विद्यार्थी लाभेश बोरोले, स्रुष्टी मोरे,निकिता सोनार, काजल जाधव व नेहा इंगळे यांनी अभ्यासपूर्ण मनोगतात विविध प्रकारचे अनुभव सांगितले. विविध स्पर्धेत विजयी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व बक्षिसे देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रंजना नेहेतेमँडम यांनी केले, प्रास्ताविक मुख्याध्यापक ए एस पाटीलसर यांनी केले. आभारप्रदर्शन एस डी मोरेसर यांनी केले. कार्यक्रम यशस्वीते साठी एस पी तायडे, सौ प्रतिभा पाटीलमँडम,एस व्ही राठोड, व्ही एस कायंदे,आदी ईतर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!