भारताचे सार्वभौमत्व छत्रपतींच्या हिंदवी स्वराज्याचे एक सोनेरी पान होय:श्री सतिश शिंदे सर
छत्रपती शिवजयंती उत्सवाच्या सोहळ्याच्या निमित्तान, विवरे, तालुका धरणगाव येथे दि.19/2/23 वार रविवार रोजी व्याख्यानाचे तसेच भारूड कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते .कार्यक्रमाचे आयोजन छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समिती व विवरे ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते.[ads id="ads1"]
कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री धनराज माळी सर यांनी केले.अथिंतीचा परिचय श्री रवींद्र माळी यांनी करून दिला.तसेच कार्यक्रमासाठी उपस्थित मान्यवरांचा सत्कार गावाचे सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायतीचे सदस्य तथा महिला बचत गटाच्या संचालिका यांनी केला.[ads id="ads2"]
अतिथींचे स्वागत एका सुंदर अशा गीताने करण्यात आले तसेच गावातील विद्यार्थी- विद्यार्थीनि व बालके यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित गीतांवर बहारदार नृत्य सादर केली.
व्याख्यानाचे प्रथम विचारपुष्प श्री रवींद्र गजरे यांनी गुंफले आपल्या व्याख्यानामध्ये आधुनिक काळातील सर्व बहुजन महापुरुषांवर शिवाजी महाराजांच्या विचारांचा कसा प्रभाव पडला व त्यांच्या विचाराने ते कसे प्रेरित झाले याचे स्पष्टीकरण अनेक उदाहरणे देऊन श्री गजरे यांनी सांगितले.
भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे प्रेरणा स्रोत छत्रपती शिवरायच आहेत असे प्रतिपादन श्री गजरे यांनी केले.व्याख्यानाचे दुसरे विचारपुष्प श्री सतिश शिंदे यांनी गुंफले.शिवरायांनी स्थापन केलेली सार्वभौम सत्ता कशी भारतीय लोकशाहीसाठी पूरक ठरते याचे स्पष्टीकरण आपल्या व्याख्यानात त्यानी केले आपल्या लोकशाहीचा व सार्वभौमत्वाचा पाया हा छत्रपती शिवरायांच्या हिंदवी स्वराज्यात दडलेले एक सोनेरी पान होय,असे प्रतिपादन श्री शिंदे यांनी केले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री गणेश पाटील यांनी केले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी गावातील तरुणांनी सहकार्य केले तसेच प्रसंगी गावातील असंख्य माता-भगिनी व आबाल वृद्ध उपस्थित होते.