विवरे ता. रावेर (समाधान गाढे) सविस्तर वृत्त असे की रावेर तालुक्यातील विवरे बुद्रुक येथील अजंदा रोडवरील पाण्याच्या टाकीतुन पाणीओव्हर फ्लो होवुन टाकीचा कॉलम मध्ये पैया मध्ये जिरत आहे ,व दिवसाला हजारो लिटर पाणी वाया जात आहे तसेच टाकीचे पाया ठिकाणी पाणी साचल्याने टाकीचा तोल जाऊ शकतो व त्या ठिकाणी जीवित हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही या ठिकाणी सरपंच उपसरपंच सह सत्ताधाऱ्यांचे दुर्लक्ष होतांना दिसत आहे. [ads id="ads2"]
सदर एका आठवड्यात वाया जाणाऱ्या पाण्याचा व या ठिकाणी अशी परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून स्थानिक नागरिकांच्या वतीने पाणीपुरवठा विरिष्ट अधिकारी यांच्याकडे तक्रार करणार असल्याची माहीती विवरे बुद्रुक विद्यमान ग्रामपंचायत सदस्य दिपक राणे व स्थानिक रहिवासी करणार आहे .