माध्यमिक विद्यालय पुरी गोलवाडे येथे शिवजयंती निमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे


रावेर (समाधान गाढे) माध्यमिक विद्यालय पुरी-गोलवाडे येथे शिवजयंती निमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरु वात दिपप्रज्वलन, प्रतिमापूजन, व "राज्यगीत" सादर करून करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी पंचायत समिती सदस्य दिपक पाटील हे होते.[ads id="ads1"]  

सांस्कृतिक कार्यक्रमात, अफजलखानाचा वध, पोवाडा, एकच / राजा इथे.., माय भवानी, अशा विविध गीतांवर नृत्य, नाटीका, व मनोगत, विद्यार्थ्यांनी सादर केले.

सदर या कार्यक्रमास, पुरी गोलवाडे, शिंगाडी- मामलवाडी गृप ग्रा. सदस्य, सरपंच, उपसरपंच, महिला-पुरुष पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.[ads id="ads2"]  

मा. मुख्याध्यापक श्री राहुल पा. सर यांच्या मार्गदर्शना खाली कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला. कार्यक्रमाचे सुत्र संचालन श्री शिवाजी पाटीलसर, मनोगत पंकज पाटील सर तसेच आभार प्रदर्शन श्री अंबादास पाटील सर यांनी केले.

श्री स्वामी स्वामी समर्थ गृप चे अध्यक्ष श्री मनोज पाटील सर यांनी कौतूक केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्री. विजय पाटील, सचिन पाटील, सचिन कचरे, देवानंद उ-हाळे, विजय- भाऊसाहेब, चेतन पाटील व मुकुंदा कोळी यांचे सहकार्य लाभले.

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!