फैजपूर ता.यावल प्रतिनिधी (सलीम पिंजारी)
फैजपूर : आपल्या वैद्यकीय व्यवसायाबरोबरच विविध प्रकारच्या सामाजिक, सांस्कृतिक व राजकीय उपक्रमांमध्ये नेहमीच सक्रिय सहभागी असणारे फैजपूर येथील युवा सामाजिक कार्यकर्ते, अल-खिज़र सोसायटीचे अध्यक्ष डॉ.दानिश शेख यांना महाराष्ट्र समाज भूषण पुरस्कार २०२३ या पुरस्काराने पुणे येथे सन्मानित करण्यात आले आहे.[ads id="ads1"]
दि.१५ फेब्रुवारी रोजी राजेश्वरी एज्युकेशन सोसायटी पुणे या नामांकित संस्थेच्या वतीने आयोजित एका कार्यक्रमादरम्यान ज्येष्ठ लेखक, विचारवंत, अभ्यासक, समीक्षक तसेच अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ.श्रीपाल सबनिस यांच्या हस्ते हा पुरस्कार डॉ.दानिश यांना देण्यात आला आहे. दरम्यान या पुरस्काराने गौरविण्यात आल्याने डॉ.दानिश यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.