माध्यमिक विद्यालय पुरी गोलवाडे येथे दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

ऐनपुर प्रतिनिधी:- विजय एस अवसरमल

      दिनांक 17 फेब्रुवारी 2023 वार शुक्रवार या दिवशी माध्यमिक विद्यालय पुरी गोलवाडे तालुका रावेर जिल्हा जळगाव येथील इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान माननीय दिलीप वैद्य सर यांनी स्वीकारले तसेच विद्यार्थ्यांना योग्य ते मार्गदर्शन केले परीक्षेमध्ये येणाऱ्या अडचणी कशा सोडवायच्या याविषयी मार्गदर्शन केले.[ads id="ads2"]  

  कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून पुरी गावचे पोलीस पाटील श्री किरण पाटील व भामलवाडी गावचे पोलीस पाटील श्री प्रमोद पाटील उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक माननीय राहुल पाटील सर यांनी केले तर शिक्षक मनोगत विजय पाटील सर व अंबादास पाटील सर यांनी केले तर सूत्रसंचालन शिवाजी पाटील सर यांनी केले व आभार सचिन पाटील सर यांनी मानले या कार्यक्रमाला सचिन कचरे सर व देवानंद उन्हाळे सर उपस्थित होते व इतर कर्मचारी यांनी मदत केली वंदे मातरम होऊन कार्यक्रमाची सांगता झाली.


#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!