शाळकरी अल्पवयीन मुलीचा यावल एसटीबस स्टँड जवळ विनयभंग ; यावल पोलिसात गुन्हा दाखल

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे


यावल (सुरेश पाटील)

यावल एसटीबस स्टँड समोर चिंचेच्या झाडा जवळ सार्वजनिक जागी अल्पवयीन मुलगी शाळेत जात असताना तिचा पाठलाग करून तिला छेडछाड करून मोबाईल नंबर दे असे म्हणून तिचा विनयभंग केल्या प्रकरणी तिने तिच्या आई-वडिलांना सांगितले असता आई-वडिलांनी रस्त्यामध्ये या मुलाला गाठले असता त्यां मुलाने पीडित मुलीच्या वडिलांशी धक्काबुक्की आणि उज्जत बाजी करून पलायन केले तर त्याची मोटरसायकल मात्र पीडित मुलीच्या वडिलांनी पकडून पोलीस स्टेशनला जमा केल्यामुळे,विनयभंग व पोस्को अंतर्गत यावल पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.[ads id="ads1"]  

           यावल बस स्टॅन्ड कडून शाळेमध्ये जाणाऱ्या एक 15 वर्षीय विद्यार्थिनी दि.16 फेब्रुवारी 23 रोजी दुपारी सव्वा वाजेच्या सुमारास घरी येत असताना चिंचेच्या झाडाखाली असलेल्या पान टपरी जवळ सार्वजनिक ठिकाणी आनंद बिराडे नावाच्या मुलाने तिला मोबाईल नंबर मागितला त्यावेळी ती तिथे न थांबता एका किराणा दुकानदार यांच्या दुकानात गेली व त्यांना हकीकत सांगितली 16 फेब्रुवारी 23 रोजी दुपारी एक वाजून पंधरा मिनिटाच्या सुमारास पीडित मुलीचे आई मुलगी सोबत प्रॅक्टिकल परीक्षेसाठी शाळेत घेऊन जात असताना बस स्टँड जवळ रोडवर दिसल्याने पिडीत मुलगीने आईस सांगितले की हाच मुलगा मागील पंधरा दिवसापासून पाठलाग करतो आहे म्हणून तिच्या आईने पतीस माहिती सांगितले असता त्यांनी तात्काळ घटनास्थळी आले असता त्या मुलाचा चेहरा दाखवला त्यास जाब विचारला असता आरोपी आनंद बिऱ्हाडे याने पीडित मुलीचे वडीलास मारहाण केली.[ads id="ads2"]  

  व तो त्या ठिकाणाहून त्याची मोटरसायकल क्र.एमएच-19 डीझेड-9828 सोडून पसार झाला सदर मुलीच्या वडिलांनी ही मोटरसायकल पकडून यावल पोलिसांच्या ताब्यात दिली,या मुलाचे नाव आनंद बिराडे असे आढळून आले आहे या संदर्भात पीडित मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून यावल पोलीस स्टेशनला भाग 5 गुरंन 46/ 2023 भादवी कलम 354 (ड) 323 बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियम कलम 7/8 प्रमाणे, गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास यावल पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार प्रदीप बोरुडे हे करीत आहेत. आरोपी आनंद बिऱ्हाडे यांचा पोलीस शोध घेत आहेत.

📣 हेही वाचा :- रावेर तालुक्यातील विवरे येथील कपिल पाटील यांची विदेशात गगनभरारी

📣 हेही वाचा:- भरधाव ट्रकच्या चाकाखाली सापडून‎ चार वर्षीय  बालिका ठार : मुक्ताईनगर तालुक्यातील घटना

📣 हेही वाचा:- अवैध गौणखनिजाचा उपसा केल्याप्रकरणी रावेर तालुक्यातील तीन जणांना २ कोटी १७ लाख रुपयाचा दंड ; कारवाईने परिसरात मोठी खळबळ 

        यावल शहरात बोरावल गेट पासून मेन रोडने बस स्टॅन्ड आवारात आणि कॉलेज पर्यंत, तसेच बुरुज चौकापासून सातोद रोडवर तहसील कार्यालय,माध्यमिक कन्या शाळा आणि शासकीय गोडाऊन पर्यंत रिकाम टेकडे टारगट मुले मोटरसायकलीवर रस्त्याच्या विरुद्ध दिशेने सुसाट वेगाने मोटरसायकली कारण नसताना फिरवत असतात आधीच अतिक्रमण आणि त्यात ठीक - ठिकाणी रस्त्यावर मुलांचे घोडके येणाऱ्या जाणाऱ्यांना नाहक त्रास देत असतात यांचा यावल पोलिसांनी बंदोबस्त करावा अशी सर्व स्तरातून मागणी होत आहे.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!